Parenting Tips : किशोरवयीन मुलांना सांभाळताना या गोष्टी लक्षात ठेवा.

किशोरवयीन मुलांच्या अवस्थेतील बद्दल.
how to care teenager
how to care teenager ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : किशोरवयीन मुलांना हाताळताना अनेक आव्हानांचा सामना पालकांना करावा लागतो. खरेतर हे वय असे आहे की, ज्यामध्ये मुले (Child) स्वतःला प्रौढ समजू लागतात. त्यांना कोणतेही बंधने आवडत नाहीत आणि त्यांना एकांत हवा असतो. इतकेच नाही तर त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात ज्यामुळे ते गोंधळातात, चिडतात, वाद घालतात ही सर्व लक्षणे या वयातील नैसर्गिक लक्षणे आपल्याला म्हणता येईल. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांच्यात आणि पालकांमध्ये समजूतदारपणा निर्माण होत असतो, तेव्हा ते बंडखोरासारखे वागू लागतात. किशोरवयीन मुलांना कसे हाताळू शकता आणि त्यांच्याशी चांगले नाते (Relation) कसे बनवू शकता याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Parenting Tips in marathi)

हे देखील पहा -

या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

१. शांता राखा-

जेव्हा तुमची मुले चिडचिड किंवा रागराग करत असतील तर अशावेळी तुम्ही शांत राहायला हवे. जर तुम्ही देखील त्यावेळी त्यांच्यावर ओरडलात तर, समस्या सुटण्याऐवजी ती अधिक गुंतागुंतीची होईल. परंतु जर तुम्ही ती परिस्थिती शांततेने हाताळली तर, तुम्ही तुमते मत अधिक चांगल्या पद्धतीने मांडू शकतील.

२. नियम तयार करा

घरात काही नियम (Rules) लागू करा आणि ते सर्वांनी पाळायला हवे. किशोरवयीन मुलांसाठी काही अतिरिक्त नियम बनवा व त्याचे कारण देखील सांगा. लक्षात ठेवा की, तुमचे मुल या वयात स्वतःला हुशार समजत असते आणि त्याच्या चुकीच्या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी ते संभाव्य प्रयत्न करत असतात. परंतु तुम्ही त्याचा उद्देश समजून घ्या आणि नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. तुमच्या या नियमाचा भविष्यात मुलाला फायदा होईल आणि चुकीच्या गोष्टींपासून बचाव ही होईल .

how to care teenager
पॉवरहाऊस असणाऱ्या मोसंबीचा ज्यूस प्या आणि पाचनशक्ती वाढवा..!

३. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा आवश्यक -

तुमच्या मुलाने नियम मोडले तर त्याला शिक्षा अवश्य करा. परंतु शिक्षा करताना त्यातून तुमचे मुलं काही तरी शिकेल या गोष्टीकडे लक्ष द्या. त्याने केलेली चूक देखील त्याला वेळीच समजवून सांगा.

४. मुलांच्या चांगल्या वर्तनावर लक्ष केंद्रित करा -

जर तुमच्या मुलाच्या वागणुकीत बदल जाणवत असेल तर तुम्ही त्यावर लक्ष ठेवायला हवे. अशावेळी त्यांना अधिक प्रोत्साहन देखील करा. त्यांच्या बदलेल्या वागणुकीबद्दल त्यांचे इतरांसमोर कौतुकही करा त्यामुळे तुमच्या बद्दल त्यांच्या मनात प्रेम व आत्मविश्वास निर्माण होईल.

५. स्वत:चे अनुकरण करणे आवश्यक आहे -

प्रत्येक वेळी मुलाला दोष देण्याऐवजी, आपण स्वतःच याचे कारण शोधणे चांगले आहे. पालकांच्या चुकांमुळे मुले बंडखोर होतात हे लक्षात ठेवा. आपली चुक असेल तर ती त्यांच्यासमोर मान्य करा.

अशाप्रकारे तुमच्या किशोरवयीन मुलांचे तुम्ही संगोपन करु शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com