Cancer Symptoms: yandex
लाईफस्टाईल

Cancer Symptoms: तुम्हाला सतत अ‍ॅसिडीटी होतेय का? हे कॅन्सरचे लक्षण असू शकतं? वाचा संपुर्ण माहिती

Acidity Problem: अनेक वेळा पोटात जास्त गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अ‍ॅसिड तयार होण्यास सुरुवात होते. या सततच्या अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे गॅस्ट्रिक कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.

Saam Tv

अनेक वेळा पोटात जास्त गॅस, अ‍ॅसिडिटी आणि अ‍ॅसिड तयार होण्यास सुरुवात होते. या सततच्या अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे गॅस्ट्रिक कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. जाणून घ्या जास्त अ‍ॅसिडिटी धोकादायक का आहे?

बहुतेक आजारांची सुरुवात पोटापासून होते. अनेक वेळा खाण्यापिण्याचे नीट पचन न झाल्याने गॅस, अ‍ॅसिडीटी आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. मात्र जास्त अ‍ॅसिड तयार होणे, ढेकर येणे किंवा अ‍ॅसिडिटी होणे हे काही वेळा धोकादायक ठरू शकते. पोटाचा कॅन्सर किंवा गॅस्ट्रिक कॅन्सरची लक्षणेही यासारखीच असतात. जी तुमच्यासाठी गंभीर आरोग्य समस्या असू शकते. मात्र, हे सर्वांसोबतच घडेलच असे नाही.

जेव्हा पोटात असामान्य पेशी वाढू लागतात तेव्हा अ‍ॅसिड रिफ्लक्स होतो. जेव्हा अ‍ॅसिड रिफ्लक्स होतो तेव्हा पोटातील अन्न नलिकेमध्ये परत येऊ लागते. त्यामुळे अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. अनेक वेळा लोक याचा संबंध पोटाच्या कर्करोगाशी जोडू लागतात, पण प्रत्यक्षात तो पोटाचा कर्करोग असेलच असे नाही. असे दीर्घकाळ होत असल्यास किंवा खूप त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. कधीकधी आम्ल आणि पोटाच्या कर्करोगाची लक्षणे सारखी असू शकतात.

पोटाच्या कर्करोगाची लक्षणे

अ‍ॅसिड रिफ्लक्स

छातीत जळजळ

अन्न गिळण्यात अडचण

अपचन आणि जास्त ढेकर येणे

वारंवार आजारी पडणे

खाल्ल्यानंतर पटकन पोट भरल्यासारखे वाटणे

भूक न लागणे आणि वजन कमी होणे

पोटात वेदना आणि ढेकूळ जाणवणे

दिवसभर थकवा आणि उर्जेची कमतरता जाणवणे

तज्ज्ञांच्या मते, गॅस्ट्रिक कॅन्सरचे एक प्रमुख कारण जेव्हा तुम्हाला जास्त प्रमाणात आणि सतत अ‍ॅसिड रिफ्लक्स होऊ लागते. जे लोक जास्त कार्बोहायड्रेट आणि जास्त चरबीयुक्त पदार्थ खातात त्यांना हा त्रास जास्त होतो. क्रॉनिक अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे पोटाच्या वरच्या थराला नुकसान होते. त्यामुळे कर्करोगाचा धोका संभवतो.

अ‍ॅसिड रिफ्लक्स म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा एसोफेजल स्फिंक्टर नावाचा स्नायू बंद होतो. पण जर एखाद्याला गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स किंवा जीईआरडीची समस्या असेल तर स्फिंक्टर कमकुवत होऊ लागतो आणि पोटातील अन्न परत वर येऊ लागते. त्यामुळे छातीत जळजळ, आम्लपित्त, आंबट ढेकर येणे, उलट्या आणि मळमळ यांसारखी लक्षणे दिसू लागतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By: Sakshi Jadhav

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT