Diabetes Sign Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Sign : शरीरातील काही बदल वेळेत ओळखा, दुर्लक्ष केल्यास Blood Sugar क्षणात वाढेल

6 Signs and Symptoms of Diabetes : रक्तातील साखरेची वाढत्या पातळीमुळे शरीरातील इतर भागांवर परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Diabetes Symptoms : आजार कोणाताही असला तरी तो होण्यापूर्वी शरीर आपल्याला काहींना काही संकेत देत असते. जे आपल्याला जाणवतात पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याकडे वेळीच लक्ष दिले तर तो गंभीर स्वरुपाचा होत नाही. त्यातील एक गंभीर आजार मधुमेह.

मधुमेहाचा आजार हा जगभरात ९० टक्के लोकांमध्ये आढळून आला आहे. मधुमेहामुळे खाण्यापिण्याच्या सवयी, आहार, झोपेची वेळ, चिंता व ताणतणावामुळे आपल्याला या आजाराला सामोरे जावे लागते. रक्तातील साखरेची वाढत्या पातळीमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. त्यामुळे शरीरातील इतर अवयव देखील खराब होतात. अशावेळी शरीराला आपल्याला काय संकेत देते हे जाणून घेऊया.

1. त्वचा काळी पडणे

मधुमेहाच्या (Diabetes) सुरुवातीला इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे शरीराचे अनेक भाग काळे पडतात. विशेषतः मान, डोळ्यांखाली आणि हातांखालची जागा गडद तपकिरी किंवा काळी होऊ लागते.

2. डोळ्यांवर परिणाम

जेव्हा तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेचे (Sugar) प्रमाण जास्त असते, तेव्हा त्याचा परिणाम डोळ्यांवर पडू लागतो आणि तुम्हाला अंधुक दिसू लागते. सुरुवातीच्या काळात बारीक-सारीक वस्तू धुसर दिसू लागते. चष्मा घातला असेल तर चष्म्याचा नंबरही वाढू शकतो.

3. हात आणि पायांना मुंग्या येणे

हातपाय सुन्न होणे हे देखील मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे, कारण या आजारात शरीराच्या नसा कमकुवत होतात आणि जेव्हा रक्तवाहिन्यांद्वारे शरीराच्या अवयवांपर्यंत रक्त पोहोचत नाही तेव्हा त्यात किंवा शरीराच्या अवयवांना मुंग्या येणे सुरू होते. सुन्न होऊ लागते.

4. मूत्रपिंड समस्या

किडनीशी (Kidney) संबंधित आजारांमागे मधुमेह हे देखील प्रमुख कारण आहे. शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे किडनीचे कार्य बिघडते आणि त्यामुळे वारंवार लघवी होणे, घोट्याला सूज येणे आणि रक्तदाब वाढणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

5. हिरड्यातून रक्तस्त्राव

मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांमुळे हिरड्यांमधून रक्त येणे, श्वासाची दुर्गंधी, दात दुखीचा त्रास आणि मौखिक आरोग्य यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

6. जखम बरी होण्यास वेळ लागणे

जेव्हा तुमच्या शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असते तेव्हा कोणतीही जखम बरी होण्यास बराच वेळ लागतो. अशावेळी या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, यामुळे जखम लवकर बरी होत नाही व त्रास देखील वाढतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT