Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : महत्त्वाची वार्ता कानी पडणार; ५ राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

Wednesday Horoscope in Marathi : काही राशींचा बुधवारचा दिवस चांगला जाणार आहे. काहींना महत्वाची वार्ता कानी पडेल.

Anjali Potdar

पंचांग

बुधवार,३ डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष शुक्लपक्ष.

तिथी-त्रयोदशी

रास- मेष नं.२३|१४ वृषभ

नक्षत्र-भरणी

योग- परिघ

करण-तैतिल

दिनविशेष-१८ प. चांगला

मेष -आपली रास कोणत्याही काम घेते पण काही वेळेला अर्धवट राहण्याची सवय असते. उतावळेपण असते. आज हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उष्णतेच्या तक्रारी वगळता आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ - कामाचे एकूण ताण आणि दगदग आज जाणवण्याचा दिवस आहे. म्हणूनच प्रवास टाळणे गरजेचे आहे. पैशाला विविध वाटा फुटतील. मनोबलही कमी राहील. काळजी घ्यावी.

मिथुन - महत्त्वाचे पत्रव्यवहार आज पार पडणार आहेत. अनेकांच्या सहकार्याने पुढे जाल. विविध लाभ मिळण्याचा आजचा दिवस आहे. विशेषतः परदेशी वार्तालाप होतील.

कर्क - तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभणार आहे. केलेल्या कामाचे योग्य ते कौतुक झाल्यामुळे मनोबल आणि आत्मविश्वास वाढता राहील.

सिंह - काही गोष्टी न ठरवता होतात तसा आजचा दिवस आहे. विशेष गुरुकृपा आपल्याला लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता कानी येईल. आपण फक्त निमित्त मात्र असतो हे आज जाणून येईल.

कन्या - नकटीच्या लग्नाला असा काहीसा दिवस आहे. म्हणून सतराशे साठ विघ्न येतीलच. केलेल्या कामात अडथळे आहेत. वाहने जपून चालवा. खर्चालाही धरबंद राहणार नाही.

तूळ - वैश्य प्रवृत्तीची आपली रास आहे.भागीदारी व्यवसायामध्ये सुयश लाभेल. इतरांवर तुमचा प्रभाव राहील. संसारीक गोष्टींमध्ये सुद्धा विशेष रस तुम्हाला आज निर्माण होईल. दिवस चांगला आहे .

वृश्चिक - केलेल्या कामाचं जणू काही "पालथ्या घरावर पाणी" असा दिवस आहे. वेळा आणि पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मनोरंजनाकडे कल असू शकेल. अनाकलनीय आजार जाणवतील.

धनु - संतती सौख्याला दिवस चांगला आहे. धनासाठी आपली रास खरच लाभदायी आहे. आज आर्थिक क्षेत्रात एखादं धाडस करायला हरकत नाही. प्रेम प्रणयामध्ये सुद्धा यश दिसते आहे.

मकर - चिकट आणि चिवट असणारी आपली रास. पुढील गोष्टींचे नियोजनही उत्तम असते. आज तुम्ही घेतलेल्या निर्णय आणि अंदाज अचूक ठरणार आहेत. मानसिक स्वास्थ, समाधान लाभणारा आजचा दिवस आहे.

कुंभ - न बोलता अविरत काम करणं हि आपल्या राशीची खासियत आहे. आज विशेषत्वाने तुमची जिद्द आणि चिकाटी वाढेल. नोकरीमध्ये सुद्धा समाधानकारक स्थिती राहील. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर येतील.

मीन - अचानक धनलाभ होईल. व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र आज तुम्ही अवलंबू शकाल. कामाच्या ठिकाणी अडथळे आले तरीसुद्धा ते पार पडतील. कुटुंबीयांचे योग्य ते सहकार्य आज लाभेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karela Chutney Recipe : कडू कारल्याची चटपटीत चटणी, साध्या जेवणाची वाढेल रंगत

HBD Salman Khan : आखा बॉलिवूड एक तरफ और सलमान खान एक तरफ; भाईजानची जंगी बर्थडे पार्टी, सेलिब्रिटी ते क्रिकेटपटू सर्वांनी लावली हजेरी

BMC Election : राज-उद्धव यांच्या ऐकीने भाजप-शिंदेंची धडधड वाढली; ६७ वॉर्डांत निकाल फिरणार?

Maharashtra Live News Update: राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींचे टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' महिलांना मिळणार नाहीत ₹४५००

SCROLL FOR NEXT