Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Wednesday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांचा दिवाळी पाडवा आनंदीमय जाणार. काहींनी महत्वाची कामे दुपारनंतर करावीत. वाचा बुधवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

पंचांग

बुधवार,२२ ऑक्टोबर २०२५,कार्तिक शुक्लपक्ष,दिवाळी पाडवा,अभ्यंगस्नान, बलिप्रतिपदा, वहीपूजन.

तिथी-प्रतिपदा २०|१७

नक्षत्र-स्वाती

रास-तुला

योग-प्रीतियोग

करण-किंस्तुघ्न

दिनविशेष-शुभ दिवस

मेष - तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कामाशी निगडित घेतलेले निर्णय अचूक आणि योग्य ठरतील. कोर्टाचे कामाशी निगडित असणाऱ्या गोष्टी आज सुरळीत होऊ लागतील. दिवस चांगला आहे. जोडीदाराबरोबर प्रेमाने वागावे लागेल.पाडवा सुकर होईल.

वृषभ - कर्मचारी वर्गाचे सहकार्य मिळेल. शत्रुपीडा नाही. अडचणी आल्या तरी दिव्यातून पार व्हाल. सणाचे खाण्यावर नियंत्रण ठेवावे. आरोग्य जपावे.

मिथुन - वैचारिक परिवर्तनाचा दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. काही सृजनशील गोष्टी आपल्याकडून घडतील. नवनवीन गोष्टींचा शोध घ्याल. विष्णू उपासना फलदायी ठरेल. प्रेमात आनंद वाटेल.

कर्क - दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह उमेद वाढवणाऱ्या घटना घडणार आहेत. जमिनीची निगडित व्यवहार होतील. घरी नव्याने खरेदी होईल. आनंदी आणि उत्साही वातावरण कुटुंबात राहील.

सिंह - नातेवाईकांच्या सहकार्याने पुढे जाणार आहात. नव्याने काही गोष्टी खांद्यावर येतील.त्या जबाबदारीने पार पाडाल. स्वतःमधील हिंमत आणि उमेद वाढती राहणार आहे. सणाचा आनंद वेगळीच ऊर्जा देईल. आनंद द्विगुणीत होईल.

कन्या - अचानक धनलाभ होईल. कौटुंबिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. दिवाळीचा उच्चांकी आनंद आजचा दिवशी आहे. धनाची भरभराट होईल. दिवस चांगला आहे.

तूळ - आरोग्य चांगले राहणार आहे. मानसिक स्वस्थता लाभेल. सामाजिक दृष्टीने आज वाटचाल होईल. दिवस सत्कारणी लागेल. जोडीदाराकडून घवघवीत ओवाळणी मिळेल. मन प्रसन्न होईल.

वृश्चिक - ठरवेल ते होईल असा दिवस नाही. वस्तू गहाळ होतील. दक्षता घ्या. लांबचे प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक स्वस्थता जपावी लागेल. खर्च वाढतील.

धनु - आडकडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या लोकांच्या सहकार्याने पुढे जाल. गुंतवणुकी मधून अनेक लाभ होतील. दिवस आनंद घेऊन आलेला आहे.

मकर - तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्ध व्हाल मन आनंदी आणि आशावादी राहील लांबचे प्रवास होतील. एखाद्या सामाजिक उपक्रमात मान मिळेल.

कुंभ - जिद्दीने कार्यरत राहणार आहात. महत्त्वाच्या गाठीभेटी बैठका आज पार पडतील. शिव उपासना फलदायी ठरेल. पाडव्याचा आनंद द्विगुणीत होईल. तीर्थक्षेत्री भेटी होतील.

मीन - महत्वाची कामे शक्यतो दुपारनंतर करा. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. मनोबल उत्तम ठेवावे लागेल. आयुष्य हा अडचणीचा प्रवास आहे हे सण अजून सुद्धा जाणवेल. दिवस संमिश्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: वनडे सिरीज जिंकल्यानंतर विराट-रोहितबद्दल काय म्हणाला गौतम गंभीर? IPL टीमच्या मालकांनाही सुनावले खडे बोल

Maharashtra Live News Update: सक्षम ताटे खून प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

Right To Disconnect 2025 Act : "कर्मचाऱ्यांना ऑफीसनंतर नो कॉल, नो ईमेल" संसदेत विधेयक मांडलं; वाचा सविस्तर

बीडमध्ये भयंकर घडलं; ग्रामपंचायत शिपायाला काळंनिळं होईपर्यंत मारलं, महिलेची छेड काढल्याचा आरोप

Dhurandhar Collection : जगभरात 'धुरंधर'ची धूम; दुसऱ्या दिवशी मोडला मोठा रेकॉर्ड, रणवीर सिंहच्या चित्रपटाने किती कमावले?

SCROLL FOR NEXT