Shreya Maskar
नेरळ मार्गे अंदाजे ५०-६० किमी अंतरावर माथेरान हे हिल स्टेशन आहे. पर्यावरणपूरक आणि वाहनांना बंदी असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. येथे तुम्हाला उन्हाळ्यात थंड वातावरण अनुभवता येईल.
माथेरान येथे वसाहतकालीन वास्तूंचा मोहक वारसा जपला आहे. 'टॉय ट्रेन' आणि 'पॅनोरमा पॉइंट' , 'इको पॉइंट' सारखी अनेक निसर्गरम्य पिकनिक स्पॉट्स येथे पाहायला मिळतात.
लोणावळा आणि खंडाळा ही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाद्वारे सहज पोहोचता येणारी दोन जुळी आणि सर्वात लोकप्रिय थंड हवेची ठिकाणे आहेत. वीकेंडला फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
भुशी धरण, टायगर पॉईंट, राजमाची पॉइंट हे येथील प्रसिद्ध स्पॉट्स आहेत. तसेच येथे खंडाळा घाट, ड्यूक्स नोज, कुणे धबधबा, लोणावळा तलाव, कार्ला लेणी, लोहगड किल्ला ही ठिकाणे देखील आहेत.
माळशेज घाट हा पश्चिम घाटातील हा एक पर्वतीय घाट मार्ग आहे. येथील अप्रतिम धबधबे, हिरवीगार निसर्गरम्य ठिकाणे, किल्ले पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगड ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे.
कर्जत येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरण उन्हाळ्यात तुम्हाला एक सुखद अनुभव देईल. येथे भिवपुरी हे ठिकाण आहे. जेथे कॅम्पिंग आणि रिव्हर राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता.
इगतपुरी हे डोंबिवलीजवळ असलेले एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. हे ठिकाण विपश्यना ध्यान केंद्र (धम्मगिरी), नयनरम्य धबधबे, घनदाट जंगल, ट्रेकिंगचे मार्ग, ऐतिहासिक किल्ले आणि पावसाळ्यातील आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.