Ratnagiri Tourism : कोकणातील 'मिनी महाबळेश्वर' पाहिलं का? कडाक्याच्या उन्हात 'येथे' मिळेल थंडावा

Shreya Maskar

कोकण

मे महिन्याच्या सुट्टीत कोकणात फिरायला जा. कोकणात रत्नागिरी येथील दापोली हे ठिकाण 'कोकणचे मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही येथे फोटोशूट करू शकता.

Konkan | google

समुद्रकिनारे

दापोली येथे मुरुड बीच, कार्दे बीच , लाडघर बीच , केळशी बीच आणि अंजर्ले समुद्रकिनारा वसलेला आहे. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Beaches | google

ऐतिहासिक ठिकाणे

दापोली येथे सुवर्णदुर्ग किल्ला, कनकदुर्ग, अंजर्ले येथील कड्यावरचा गणपती, असुदचे केशवराज मंदिर आणि केळशी ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत. येथे मराठा साम्राज्य आणि पेशवेकालीन इतिहासाचा उत्तम मिलाफ आहे.

fort | google

कधी भेट द्यावी?

दापोलीला तुम्ही कधीही भेट देऊ शकता. मात्र हिवाळ्यात आणि पावसाळ्यात येथे स्वर्गाहून सुंदर वातावरण अनुभवता येते. या काळात तापमान आल्हाददायक आणि सुखद असते.

When to Visit | google

कसं जायचे?

दापोलीला जायचे असेल तर खेड या स्टेशनला तुम्ही उतरा. त्यानंतर खेड वरून तुम्ही रिक्षा किंवा एसटीने दापोलीला पोहचाल.

beach | google

लाडघर समुद्रकिनारा

लाडघर समुद्रकिनारा आपल्या गडद लाल रंगासाठी ओळखला जातो. पॅरासेलिंग , बनाना राईडसारख्या जलक्रीडांसाठी आनंद घेता येतो. हे ठिकाण डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. google

Beach | yandex

कड्यावरचा गणपती

अंजर्ले येथे कड्यावरचा गणपती आहे. हे जागरूक देवस्थान आहे. जिथून सभोवतालचे विहंगम दृश्य दिसते.

Kadyavarcha Ganpati | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Beach | yandex

NEXT : मराठ्यांची सागरी ताकद! वाचा'दापोली'जवळील अभेद्य किल्ल्याचा इतिहास

Ratnagiri Tourism | saam tv
येथे क्लिक करा...