Ratnagiri Tourism : मराठ्यांची सागरी ताकद! वाचा'दापोली'जवळील अभेद्य किल्ल्याचा इतिहास

Shreya Maskar

रत्नागिरी

रत्नागिरी येथील सुवर्णदुर्ग किल्ला हा १६ व्या शतकातील एक 'सुवर्ण किल्ला' (Golden Fort) म्हणून ओळखला जाणारा सागरी दुर्ग आहे.

Ratnagiri | google

सुवर्णदुर्ग किल्ला

सुवर्णदुर्ग किल्ला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीजवळ असलेल्या हरनाई गावाच्या किनाऱ्यालगतच्या एका खडकाळ बेटावर वसलेला आहे. जेथून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Suvarnadurg Fort | google

इतिहास

हरनाई बंदरावरून बोटीने साधारण १५ मिनिटांचा प्रवास करून सुवर्णदुर्ग किल्ल्यावर पोहोचता येते. एकेकाळी या किल्ल्याची धुरा कान्होजी आंग्रे यांच्याकडे होती.

History | google

वैशिष्ट्ये

८ एकर क्षेत्रात विस्तारलेला सुवर्णदुर्ग किल्ला त्याच्या भक्कम तटबंदीसाठी, २४ बुरुजांसाठी आणि मराठा आरमाराच्या इतिहासातील त्याच्या महत्त्वपूर्ण स्थानासाठी प्रसिद्ध आहे.

Features | google

कोकण किनारपट्टी

१६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्ग किल्ला जिंकून घेतला. कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी मराठा आरमाराचे एक प्रमुख तळ म्हणून या किल्ल्याचा उपयोग केला जात असे.

The Konkan Coastline | google

इतर किल्ले

सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळील प्रमुख किल्ले कनकदुर्ग , फतेहगड आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेल्यावर येथे नक्की भेट द्या.

Kanakdurg | google

रत्नागिरीतील पर्यटन स्थळे

रत्नागिरीत गणपतीपुळे मंदिर व बीच, थिबा पॅलेस, रत्नदुर्ग किल्ला, आरे-वारे सागरी महामार्ग, जयगड किल्ला ही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.

Ganpatipule | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Ratnagiri Tourism | saam tv

NEXT : कठीण चढाई पण अद्भुत नजारे; नाशिकमध्ये लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Nashik Tourism | google
येथे क्लिक करा...