Swara Bhasker on Body Shaming: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. बाळांतपणानंतर वाढलेल्या वजनावरून सातत्याने ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचं तिने उघड केले. आता एक सोशल मीडियावर पोस्ट करुन या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक कोलाज शेअर केला. या कोलाजमध्ये आठ वर्षांपूर्वीचा एक फोटो आणि सध्याचा फोटो होता. नव्या फोटोमध्ये ती तिची मुलगी ‘राबिया’ला कडेवर घेऊन उभी आहे. २०२३ मध्ये आई झाल्यानंतर तिच्या शरीरात झालेले बदल नैसर्गिक असल्याचं सांगत, तिने ‘बॉडी-शेमिंग’विरोधात ठाम भूमिका मांडली.
तिने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, स्त्रीच्या शरीराचा उद्देश केवळ लैंगिक आकर्षणापुरता मर्यादित नसतो. आपल्या शरीराने एका नव्या जीवाला जन्म दिला आहे, त्यामुळे त्यात बदल होणं स्वाभाविक आहे. माझ्या शरीरावर फक्त माझाच अधिकार आहे.” असं ती म्हणाली. ‘बाउन्स बॅक’ म्हणजेच प्रसूतीनंतर लगेच पूर्वीसारखं दिसण्याच्या दबावालाही तिने विरोध दर्शवला.
स्वराने सांगितलं की, काही सोशल मीडिया युजर्सनी तिच्या जुन्या फोटोवरून आक्षेपार्ह आणि टोमणे मारणाऱ्या कमेंट्स केल्या. एका युजरच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने अशा मानसिकतेवर टीका केली. “अशा प्रकारचं ट्रोलिंग संवेदनशीलतेचा अभाव दाखवतं,” असं ती म्हणाली.
तिच्या मते, प्रसूतीनंतर महिलांनी पूर्वीसारखं दिसावं, असा समाजाकडून येणारा दबाव चुकीचा आहे. “एकदा तुम्ही आई झालात की आयुष्य पूर्णपणे बदलतं, आणि ते स्वीकारणं गरजेचं आहे,” असं तिने नमूद केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.