Shukra Gochar saam Tv
राशिभविष्य

Shukra Gochar: शुक्राचं गोचर करणार मालामाल; या राशींवर पडणार पैशांचा पाऊस

शुक्राचा वृषभ राशीत प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो. या गोचरामुळे काही राशींना धन, प्रेम आणि करिअरमध्ये मोठा फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

१९ एप्रिल २०२६ रोजी, धन, समृद्धी, आनंद आणि आकर्षणाचा ग्रह शुक्र स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्राचं स्वतःच्या राशीतील गोचर अत्यंत शुभ मानलं जातं.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, या काळात तो बलवान स्थितीत असतो. याचा धन, प्रेम, ऐश्वर्य, नातेसंबंध आणि करिअरवर थेट परिणाम होतो. अनेक राशींना या गोचरचा फायदा होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते पाहूयात.

वृषभ

वृषभ ही शुक्राची स्वराशी आहे. त्यामुळे याठिकाणी शुक्राचा प्रबळ प्रभाव असतो. या काळात भौतिक सुखसोयी वाढतात, आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनदेखील अधिक चांगलं होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि प्रलंबित रक्कम मिळण्याची शक्यता आहे.

कन्या रास

हे शुक्र गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्य अधिक चांगला होणार आहे. परदेश प्रवास किंवा दूरच्या ठिकाणांहून लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ असणार आहे. त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी हे गोचर प्रेम आणि सर्जनशीलता या क्षेत्रांमध्ये यश घेऊन येणार आहे. या काळात तुम्हाला नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हं आहेत आणि गुंतवणुकीतून नफा मिळू शकणार आहे. प्रेमजीवनही खूप चांगलं राहणार आहे.

मीन रास

मीन राशीसाठी हे गोचर संवाद आणि नेटवर्किंगमध्ये यश मिळवून देणार आहे. तुमच्या शब्दांचा इतरांवर प्रभाव पडणार आहे. ज्यामुळे करिअरच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. अगदी लहान प्रयत्नांतूनही मोठे फायदे मिळू शकतात.

Disclaimer : राशीभविष्य ज्योतिषशास्त्राच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. या माहितीवर आधारित घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 गोष्टी

Maharashtra News Live Update: पंचायतराज समितीकडून अकोला जिल्हा परिषदेची झाडाझडती

Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

SCROLL FOR NEXT