Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Tuesday Horoscope : गोडधोड खाण्याचे योग, धनलाभ होणार; ५ राशींच्या आयुष्यात गोडवा वाढणार

Tuesday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांना गोडधोड खाण्याचे योग आहेत. तर काहींना धनलाभ होईल. वाचा मंगळवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

पंचांग

मंगळवार,२डिसेंबर २०२५,मार्गशीर्ष शुक्लपक्ष,

भौमप्रदोष.

तिथी-द्वादशी १५|५८

रास-मेष

नक्षत्र-अश्विनी

योग-वरीयान

करण-बालव

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष - आयुष्यात प्रगती करण्यासाठी स्वतः काही गोष्टींसाठी आपण ठाम असावे लागते. आज तुम्ही घेतल्याने निर्णय योग्य ठरतील. आरोग्य उत्तम राहील. धावपळ आणि दगदग आपल्याला आवडते आणि तसाच आजचा दिवस असेल.

वृषभ - खर्चाला आज हात आखडता घेऊन चालणार नाही. रादर खूप खर्च होईल अशा काही गोष्टी घडतील. तब्येतीच्या तक्रारी वाढतील. विनाकारण खर्च झाल्यामुळे मनस्ताप सुद्धा वाढेल.

मिथुन - नव्याने ओळखी आणि परिचय करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मैत्रीचे बंध दृढ होतील. जवळच्या लोकांबरोबर स्नेहभोजनाचे योग आहेत.

कर्क - विविध वाहनांमधून फिरणे होईल. कामे मार्गी लागतील. आपल्या वरिष्ठ व्यक्तीकडून आपले कौतुक होईल. कदाचित बढतीचे योगही दिसत आहेत. दिवस चांगला आहे .

सिंह - मोठ्या प्रवासाचे योग आहेत. कदाचित धार्मिक क्षेत्री भेटी देणे होईल. नातवंड सौख्याला दिवस उत्तम आहे. समाजामध्ये आपली एक चांगली पत आज निर्माण होईल. विशेष सन्मान होतील.

कन्या - बुद्धी चातुर्य असणारी आपली रास आहे. आज मात्र कोणत्याही गोष्टी ढिलाई करून चालणार नाही. बेसावध राहू नका. एखाद्या गोष्टीत अडकण्याची शक्यता आहे. अधिक पैशाचा मोह आज बरा नव्हे.

तूळ - जोडीदाराबरोबर सौख्य अनुभवाल. नव्याने काहीतरी खरेदी होईल. एकमेकांच्या अनुमतीने संसाराची पुढील वाट सुकर होईल. व्यावसायिक क्षेत्रातही चांगली घोडदौड आज राहील. कोर्ट कचेरीची कामे योग्य पार पडतील.

वृश्चिक - अबोला असूनही प्रेम लाभेल. अनेक दिवस गुंता न सुटलेल्या गोष्टी आज सहज सुटतील. आपल्याला खूप खंबीर राहावे लागेल. हितशत्रूंचा त्रास आहे पण त्यावर मात करावी लागेल. आपले, परके ओळखून पुढे गेलात तर दिवस चांगला आहे.

धनु - "छडी लागे छम छम, विद्या येई घमघम" असा काहीसा दिवस आहे.अभ्यासासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतील तर चांगले यश मिळेल. उपासनेला दिवस चांगला आहे. दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावर आज राहील.

मकर - जुन्याचे नवे करण्यासाठी आज विशेषत्वाने झटाल. घरामध्ये काही नाविन्यपूर्ण गोष्टींचे आगमन होईल. जुन्या गोष्टी लयाला जातील. काहीतरी नवीन उर्मी घेऊन आलेला आजचा दिवस आहे. शेतीच्या कामात प्रगती होईल.

कुंभ - भावंडसौख्य चांगले आहे. जवळचे प्रवास होतील. जुने पत्रव्यवहार मार्गी लागून कामे सुरळीत होतील. शेजारील व्यक्तींचे योग्य ते सहकार्य आज आपल्याला लाभेल.

मीन - गोडधोड खाण्याचे योग आहेत. कुटुंबीयांचे सहकार्य आज चांगले लाभेल. धनदायी असा दिवस आहे. काही दिवस असे येतात - की असा विचार येतो, आयुष्यात आपल्याला कशाचीच कमी नाही. तो आजचा दिवस आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price: सोन्याच्या दरवाढीचा स्फोट होणार, सोनं ३ लाखांवर जाणार; तज्ज्ञांचा धडकी भरवणारा अंदाज

क्रिकेट विश्वावर शोककळा, दिग्गज खेळाडूच्या वडिलांचं निधन

Maharashtra Live News Update : धुळवडीनिमित्त ब्रास बँडवर थिरकल्या आमदार मंदा म्हात्रे

Wednesday Horoscope: उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील, कामाचा ताण जाणेल, वाचा बुधवारचं राशीभविष्य

Rajya Sabha: भाजपचे अध्यक्ष आता खासदार होणार, 'या' राज्यातून मिळाली उमेदवारी, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT