ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात अन्नाला देवाचे प्रसाद मानले जाते. मान्यतेनुसार, अन्नाचा कधीही अनादर होता कामा नये.
वास्तुशास्त्रामध्ये, देवी अन्नपूर्णला प्रसन्न करण्यासाठी अन्नपदार्थ बनवण्यापासून ते जेवण ग्रहण करण्यापर्यंतसाठी विशेष उपाय सांगितले आहेत.
मान्यतेनुसार,आंघोळ न करता जेवण बनवू नये. आंघोळ न करता जेवण बनवल्याने अन्न अपवित्र होते.
स्वयंपाक घरात जेवण बनवताना दरवाजा नसावा. जर दरवाजा असेल तर त्या व्यक्तीने थोडे बाजून सरकून जेवण बनवावे.
स्वयंपाक घरात पूर्व दिशेला खिडकी असावी. यामुळे स्वयंपाक घरात सकारात्मक उर्जेचा वास असतो. जर आर्थिक अडचणी असतील तर उत्तरेकडे तोंड करुन जेवण बनवा.
जेवण बनवल्यानंतर देवाला नैवैद्य देऊन अर्पण करा. यानंतरच, जेवण प्रसाद म्हणून ग्रहण करा.
जेवण करण्यापूर्वी तुमच्या ईष्ट देवताला नैवाद्य द्या. तसेच गाईसाठी एक चपाती काढून ठेवा.