स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

Nagpur Smart Meter Bill Hike Consumer Protest: स्मार्ट मीटरविरोधात नागपूरमध्ये पुन्हा एकदा ग्राहकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय... स्मार्ट मीटर लावल्यानंतर ग्राहकांच्या विजबिलात तब्बल चार पट वाढ झाल्याचा आरोप केला जातोय... त्यामुळे महावितरणकडून स्मार्ट लूट सुरु असल्याचा आरोप ग्राहकांनी केलाय... नेमकं प्रकरण काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Nagpur residents protest against inflated electricity bills after installation of smart meters.
Nagpur residents protest against inflated electricity bills after installation of smart meters.saam tv
Published On

वीजबिल कमी व्हावं म्हणून लाखो रुपये खर्च करून घराच्या छतावर सोलर पॅनल बसवणाऱ्या ग्राहकांनाच आता महावितरणनं हजारो रुपयांच्या बिलांचा जबरदस्त झटका दिलाय. नागपुरात स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अचानक ग्राहकांना 10 हजारांपासून लाखो रुपयांपर्यंतची फुगलेली बिले येतायत... त्यामुळे नागरिक पुरते हैराण झालेत.... नागपुरातील शहापूरकर यांच्या कुटुंबालाही या स्मार्ट मीटरचा मोठा फटका बसलाय. त्यांच्या घरात 4 किलोवॅटचे सोलर पॅनल बसवलेले असताना, पूर्वी कडक उन्हाळ्यातही अवघे 500 ते 700 रुपये बिल यायचे. मात्र, आता हे बिल अचानकपणे हजारो रुपयांनी वाढल्यानं स्मार्ट मीटरचा ग्राहकांना फटका बसतोय...

दुसरीकडे स्मार्ट मीटरमुळे बिले तीन ते चारपट वाढल्याचा आरोप करत काँग्रेसनं सरकारवर हल्लाबोल केलाय. ग्राहकांना न सांगता मीटर बदलणं, थकबाकी दाखवत वीजपुरवठा खंडित करण्याच्या प्रकारांमुळे मीटर लावणाऱ्या कंपनीवर आणि महावितरणवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसनं केलीय़.

दरम्यान महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि नागरी संघर्ष समितीनेही राज्यभरातून अशाच तक्रारी येत असल्याचा दावा केलाय. गडचिरोलीत तर मजुरी करणाऱ्या महिलाला तब्बल 99 हजारांचे बिल असल्याचा आरोप मोहन शर्मा यांनी साम टीव्ही शी बोलताना केलाय...स्मार्ट मीटरमधील तांत्रिक घोळामुळेच हा बिलांचा स्फोट झालाय... मात्र चूक जरी महावितरण आणि स्मार्ट मीटर लावणाऱ्या कंपन्यांची असली तरी नियमित विजबिल भरणाऱ्या ग्राहकांना नाहक अंधारात राहण्याची वेळ आलीय.. राज्यात अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरविरोधात आंदोलनं करण्यात आली. मात्र स्मार्ट मीटरच्या या घोळामुळे नागपूरमधील सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com