एकत्र प्रवास, शिंदेसेना अस्वस्थ? ठाकरेंची उच्चस्तरीय चर्चेची गुगली

Uddhav Thackeray Fadnavis Flight Meeting Shinde Reaction: मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय चर्चा झाल्याची गुगली उद्धव ठाकरेंनी टाकलीय. त्यामुळे शिंदेसेनेत अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. या प्रवासात कोणती चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी यातून नेमका काय संदेश दिला? शिंदेंनी यावर काय भूमिका मांडलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis seen during a joint flight, sparking fresh political speculation in Maharashtra.
Uddhav Thackeray and Devendra Fadnavis seen during a joint flight, sparking fresh political speculation in Maharashtra.saam tv
Published On

मुंबई ते नागपूर... अंतर दीड ते दोन तासांचं... पण या प्रवासात जे घडलं, त्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चांना उधाण आलंय. कारण सोबत होते राज्याचे दोन आजी-माजी मुख्यमंत्री. एकेकाळचे मित्र... आता विरोधक... उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस. मात्र हा फक्त विमानप्रवास नव्हता... तर महाराष्ट्राच्या राजकारणात नवे तर्क वितर्क लढवायला लावणारा प्रवास ठरला. कारण अवघ्या चार दिवसांपूर्वीच ठाकरेसेनेचे सहा खासदार शिंदेसेनेत गेले. खासदारांच्या या फुटीवर पुर्णपणे अलिप्त राहिलेल्या फडणवीसांसोबत ठाकरेंनी हवेत उच्चस्तरिय चर्चा केली. या विमान प्रवासानंतर उद्धव ठाकरेंनी जी राजकीय गुगली टाकली, त्यावर थेट एकनाथ शिंदेंनाही भाष्य करावं लागलं. यावरून आता राजकीय वर्तुळात गल्लीपासून दिल्लीपर्यंत तर्क-वितर्कांना ऊत आलाय.

शिंदेसेनेकडून हा निव्वळ योगायोग असल्याचं सांगितलं जात असलं... तरी राजकारणात योगायोगांपेक्षा संकेतांनाच जास्त महत्त्व असतं. ठाकरेसेनेचे सहा खासदार शिंदेंकडे गेल्यानंतर केंद्रात शिंदेंचं राजकीय वजन वाढलं. एनडीएमध्ये शिंदेसेना आता तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरलाय. त्यामुळे भाजपमध्येही अंतर्गत राजकीय समीकरणं बदलत असल्याची चर्चा सुरू झाली. नुकत्याच झालेल्या या खासदारांच्या फुटीनं राज्यात शिंदेंना अधिक बळ दिलं जात असल्याची कुजबूज दबक्या आवाजात सुरु झाली. मात्र खासदार संजय राऊतांनी यावर जाहीरपणे भाष्य केल्यानं याची खुली चर्चा होऊ लागलीय

तृणमूलचे खासदार फुटले... पण ते थेट भाजपात न जात एका अशा पक्षात गेले ज्याची ओळख कुणालाच नव्हती. 15 दिवसांतच ठाकरेंचे सहा खासदारही भाजपमध्ये न जाता शिंदेसेनेत गेले. त्यामुळे केंद्रात घडणाऱ्या राजकीय हालचालींकडे एक मोठा राजकीय गेमप्लॅन म्हणून पाहिलं जातंय. त्यातच ऑपरेशन टायगरचा देवेंद्र फडणवीसांना जास्त धोका असल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला. त्यामुळे शिंदे-शहा विरुद्ध फडणवीस... असं राजकीय चित्र उभं राहतंय का, हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळेच उद्धव ठाकरेंसोबतचा फडणवीसांचा हा विमानप्रवास... फक्त योगायोग होता... की शिंदेसेनेला संकेत देण्यासाठी जुन्या मित्राशी साधलेला राजकीय संवाद? या प्रश्नांचं उत्तर येणारा काळात समोर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com