तुम्हीही कार चालवत असाल तर जरा सावध व्हा... कारण तुमच्या कारमधील एअर बॅग तुमचा काळ ठरू शकते...होय तुम्ही बरोबर ऐकताय....गाडीचा अपघात झाल्यास चालकाचा जीव वाचवण्यासाठी कारमध्ये 'एअरबॅग' दिलेली असते. पण हीच एअरबॅग जर कोणाचा जीव घेऊ लागली तर? असाच धक्कादायक प्रकार भाईंदरमध्ये घडलाय... भाईंदरच्या प्लेजंट पार्कमध्ये 25 वर्षीय तरुण कार चालवत असताना अचानक एअरबॅग उघडल्यानं तरुणाचा मृत्यू झालाय... मात्र एअरबॅग नेमकी कशामुळे उघडली आणि यात काही तांत्रिक बिघाड आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे...
विशेष म्हणजे एअर बॅगचा हा स्फोट इतका भयानक होता की, स्टेरिंगमध्ये असलेली फायबरची प्लेट थेट मोहितच्या मानेमध्ये घुसली. यात मोहितच्या मानेला अत्यंत गंभीर दुखापत झाली...या धक्कादायक घटनेमुळे आता तसचं लाखो रुपये मोजून ग्राहक जी गाडी घेतात, ती खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय...त्यामुळेच साम टिव्हीनं एक्सपर्टशी बोलून एअर बॅग अचानक उघडण्यामागील कारणं जाणून घेतली....
आरटीओ आणि होंडा कंपनीच्या तपासणीनंतर या स्फोटामागचं नेमके कारण समोर येईलच.काय काळजी घ्याल?
काय काळजी घ्याल?
कार चालकांनी आपल्या कारचं सर्व्हिसिंग नेहमी अधिकृत सेंटरमधूनच करा.कारच्या स्टेरिंग किंवा डॅशबोर्डवर अनधिकृत अॅक्सेसरीज लावणं टाळा. डॅशबोर्डवर 'Airbag' चे इंडिकेटर किंवा वॉर्निंग लाईट सुरू असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.
मोहित सोनी या तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय..मात्र या घटनेने प्रत्येक कार चालकाचा थरकाप उडवलाय.. कारण अपघातात तुम्हाला वाचवणारी आणि सुरक्षित ठेवणार एअर बॅग तुमच्या मृत्यूचं कारण ठरू शकते....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.