Laxmi Narayan Yog saam tv
राशिभविष्य

Tirgrahi Yog: मकर राशीत बनतोय त्रिग्रही राजयोग; 'या' राशींची धनलाभासह होणार भरपूर प्रगती

Tirgrahi Yog In Makar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे गोचर मानवी जीवनात मोठे बदल घडवून आणते. जेव्हा तीन महत्त्वपूर्ण ग्रह एकाच राशीत एकत्र येतात, तेव्हा त्या शुभ योगाला 'त्रिग्रही राजयोग' असे म्हणतात.

Surabhi Jayashree Jagdish

ग्रहांची स्थिती ही एका ठराविक काळानंतर बदलत असते. यामुळे अनेक शुभ योग देखील तयार होतात. 2026 च्या सुरुवातीला अनेक शुभ योग आणि राजयोग तयार होणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीला शक्तिशाली त्रिग्रही योग मकर राशीत निर्माण होणार आहे. हा योग ग्रहांचा राजा सूर्य, धनाचा दाता शुक्र आणि व्यापाराचा दाता बुध यांच्या संयोगाने तयार होईल.

या योगामुळे काही राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होणार आहे. या काळात नवीन नोकरीच्या संधी, अपार धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींच्या लोकांना लाभ होणार आहे ते पाहूयात.

धनु रास (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. यावेळी आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी मदत होऊ शकणार आहे.

मेष रास (Aries Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग शुभ फलदायी ठरणार आहे. कामकाजात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसायातून फायदा होणार आहे. अचानक धनलाभाचे योग तयार होऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही योग्य वेळी महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

मीन राशि (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग लाभदायी ठरणार आहे. हा योग तुमच्या राशीपासून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी तयार होईल. त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ होईल. नवीन स्त्रोतांमधून तुम्ही धन कमवू शकाल. शिक्षण किंवा कौशल्य विकासाच्या क्षेत्रात प्रगती होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

पुणे ग्रँड टूरमध्ये अप्पांची धडाकेबाज एन्ट्री; वय ७०, जोश मात्र तरुणाला ही लाजवेल असा

SCROLL FOR NEXT