Surya Gochar: 12 महिन्यांनंतर ग्रहांचा राजा गुरुच्या घरात प्रवेश; 'या' राशींची तिजोरी संपत्तीने भरणार

Surya Dev Transit In Dhanu: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका निश्चित वेळेनंतर राशी बदलत असतो. ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. पण तब्बल १२ महिन्यांनी सूर्य जेव्हा देवगुरु बृहस्पतीच्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा तो काळ काही राशींसाठी 'सुवर्णकाळ' घेऊन येतो.
Rashi Surya Gochar
Rashi Surya Gochar google
Published On

वैदिक पंचांगानुसार, ग्रहांचा राजा सूर्यदेव साधारणपणे 30 दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो वेळोवेळी शत्रू आणि मित्र राशींमध्ये भ्रमण करत असतो. डिसेंबर महिन्यात सूर्यदेव आपल्या मित्र गुरुच्या राशीत म्हणजेच धनु राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे काही राशींवर सूर्यदेवांची विशेष कृपा राहील.

या काळात त्या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तसंच पद-प्रतिष्ठा मिळण्याचे योग तयार होत असल्याची शक्यता आहे. यावेळी कोणत्या राशींना या काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे ते पाहूयात.

मिथुन रास (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवांचा हा राशी परिवर्तन सकारात्मक ठरू शकणार आहे. सूर्यदेव तुमच्या गोचर कुंडलीतील सप्तम भावात भ्रमण करतील. त्यामुळे या काळात तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. कौटुंबिक नात्यांमध्ये मधुरता वाढण्याची शक्यता आहे. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

Rashi Surya Gochar
Sun transit: 12 महिन्यांनी सूर्य करणार मंगळाच्या घरात प्रवेश; 'या' राशींच्या घरी पडेल पैशांचा पाऊस

कन्या राशि (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवांचा गोचर लाभदायी ठरणार आहे. सूर्यदेव तुमच्या राशीपासून चतुर्थ भावात भ्रमण करणार आहे. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. या काळात आईसोबतचे संबंध अधिक दृढ होणार आहेत. करिअरमध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे.

Rashi Surya Gochar
Shani Gochar: 27 वर्षानंतर शनी शत्रू ग्रहाच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींवर बरसणार शनीदेवाची कृपा

मीन रास (Pisces Zodiac)

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवांचं गोचर करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत शुभ ठरणार आहे. सूर्यदेव तुमच्या राशीपासून कर्मभावात भ्रमण करणार आहेत. त्यामुळे कामकाजात विशेष प्रगती होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची संधी मिळू शकणार आहे. कुटुंब आणि आर्थिक बाबींमध्ये यश मिळेल.

Rashi Surya Gochar
Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य शनीच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींच्या घरी येणार लक्ष्मी, सोन्यासारखे दिवस होणार सुरु

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com