Budh Uday in Kumbh Rashi saam tv
राशिभविष्य

Budh Uday: फेब्रुवारीपासून चमकणार या ३ राशींचं नशीब; 29 दिवसांनंतर बुध ग्रहाचा होणार उदय

Mercury Uday In Kumbh 2026: २९ दिवसांनंतर बुध ग्रहाचा उदय होत असून फेब्रुवारी महिन्यात हा ग्रहयोग काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. बुध ग्रह हा बुद्धिमत्ता, संवाद आणि व्यापाराचे प्रतीक मानला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी काही ग्रह उदय आणि अस्त होणार आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये अनेक ग्रहांचा उदय, वक्री आणि अस्त होणार आहे. ज्याचा मानवी जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, व्यवसाय आणि शेअर बाजारासाठी जबाबदार असलेला बुध ग्रह फेब्रुवारी २०२६ मध्ये उदयाला येणार आहे. याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. यावेळी तीन राशी आहेत ज्यांना शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये उत्पन्न आणि नफा वाढणार आहे. यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे ते पाहूयात.

मेष रास

बुध राशीचा उदय मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढू शकणार आहे. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे देखील कमवू शकणार आहात. शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमधून देखील फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकणार आहे.

वृषभ रास

बुध ग्रहाचा उदय तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येऊ शकणार आहे. नोकरदार व्यक्तींना कामावर नवीन जबाबदाऱ्या मिळू शकणार आहेत. शेअर बाजार, मार्केटिंग किंवा मीडियाशी संबंधित असेल तर तुम्हाला लक्षणीय नफा मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात.

कुंभ रास

बुध ग्रहाचा उदय तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. काही काळापासून रखडलेली कामं आता पूर्ण होऊ लागली आहेत. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील आणि तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळणार आहे. विवाहित व्यक्तींना एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangesh Kalokhe : २० लाख नाही तर १ कोटींची सुपारी दिली, मंगेश काळोखे हत्या प्रकरणात शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप

Hair Care : केस वाढण्यासाठी 'हा' घरगुती हेअर मास्क तुम्ही कधीच लावला नसेल, लगेचच ट्राय करुन पाहा

Vande Bharat: वंदे भारतबाबत रेल्वेचा मोठा निर्णय, २४ डब्याची ट्रेन लवकरच धावणार; आता प्रवास होणार आणखी सुसाट

Maharashtra Live News Update: नाशिक महापालिकेच्या महापौर पदाचा चेहरा ३ फेब्रुवारीला होणार स्पष्ट

Long Haircuts For Women: लांब केसासाठी 5 युनिक हेअरकट्स, जे करायला सोपे अन् दिसायला भारी

SCROLL FOR NEXT