Tuesday Horoscope: दत्त उपासना ठरेल फलदायी, कामातले अडथळे होणार दूर, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

प्रेम केलं आहे तर त्यासाठी टिकवण्यासाठी काही खर्चही करायला लागेल. आज आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी खर्च होईल. धनसंचायाच्या थोडे मागेच पडाल. व्यवहार जपण्यास साठी अनेक गोष्टी कराल.

Mesh | saam tv

वृषभ

घराची डागडुजी, त्याच्यावर पैसा खर्च करणे किंवा एखादा जुने घर घेण्याचा विचारात असाल तर त्या गोष्टी आज तुमच्याकडून पूर्ण होतील. भावंडांचे याच्यासाठी वेगळी मदत होईल.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

प्रवासासाठी खर्च होईल. नाती जपण्यासाठी आज विशेष तुमची धडपड असेल. नव्याने गुंतवणूक, धनसंचय यासाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक जिव्हाळा असेल.

Mithun | saam tv

कर्क

जितके स्वतःला जवळ कराल तेवढे आज आनंदी रहाल. आपल्यातील नवी कला, काव्य याचे प्रकटीकरण होईल. एक वेगळा आत्मविश्वास आज घेऊन तुम्ही इतरांपुढे वावराल.

kark | saam tv

सिंह

महत्वाचे ऐवज आणि जिन्नस आज सांभाळणे गरजेचे आहे. मौल्यवान गोष्टी गहाळ होण्याची शक्यता आहे.खर्च वाढता राहील.मनस्तापही त्याचबरोबर वाढेल.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

सून आणि जावई यांच्या प्रेमात तर आज काहीतरी वेगळे कराल. नातेसंबंधात आनंद लाभेल. जुन्या गुंतवणूक मधून फायदा होणार आहे .शक्तीने नाही तरी बुद्धीने आज कामे कराल.

Kanya Rashi | Saam TV

तूळ

कामासाठी भरपूर प्रवास होतील. सहकाऱ्यांच्या मनात तुमच्याबद्दल आपलेपणा असेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन आघाडीवर रहाल. कामात वाढ होईल. दिवस चांगला आहे.

तूळ राशी | saam tv

वृश्चिक

एकीहाती काम करणे आपल्याला कायमच आवडते. आज मनासारखी कामे होतील. त्याचबरोबर तीर्थयात्रेला सुद्धा जाण्याचे योग आहेत. प्रवासातून फायदा आहे. कामातून यश सहज मिळेल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

काहीतरी वैचित्र्य आपल्या राशीमध्ये कधीतरी दिसते." अर्धा घोडा अर्धा माणूस" अशा चिन्हामुळे स्वभाव ओळखणे कठीण असते. आज लहरीपणा टाळणे गरजेचे आहे. स्वमग्न होऊन काम केल्यास त्याला गती येईल. मृत्यू भय राहील.

Dhanu Rashi | Yandex

मकर

"जोडी तुझी माझी" असा काहीसा दिवस आहे. संसारामध्ये एकमेकांची इच्छा पूर्ण करण्यामध्ये मुशगुल असाल. सामंजस्याने कामे होतील. व्यवसायामध्ये प्रगतीचे योग आहेत.

मकर | Saam Tv

कुंभ

जोडीदाराचे म्हणणे मान्य करण्यासाठी, त्यांच्यावर पैसा खर्च होईल. नातेवाईकांमध्ये गैरसमज निर्माण होतील. तब्येतीच्या तक्रारी जाणवतील. काळजी घ्या.

Kumbh Rashi | Saam TV

मीन

दत्त उपासना आज करणे योग्य राहील. देवाकडे काही मागता अनेक गोष्टी आज मिळतील. लॉटरी, रेस, शेअर्समध्ये भरभक्कम फायदा होईल.

Meen | Saam Tv

NEXT: kitchen Hacks: बटाट्यांना कोंब फुटलेत? नरम पडतात? १ सिंपल ट्रिक, महिनाभर राहतील चांगले

keep potatoes fresh
येथे क्लिक करा