Shukra Shani Gochar  Saam Tv
राशिभविष्य

Dhanadhya yoga: शनी-शुक्राच्या युतीने बनला धनाढ्य योग; नावाप्रमाणे 'या' राशींच्या व्यक्तींना मिळवून देणार पैसा

Shani and shukra made dhanadhya yoga: या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. तर काही राशींना करियरमध्ये चांगली संधी मिळणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे त्याची युती होते आणि राजयोगांची निर्मिती होते. कुंभ राशीमध्ये शनी आणि शुक्राचा संयोग तयार झाला आहे

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, धनाढ्य योग निर्माण झाला आहे. हा योग तयार झाल्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्याने आनंद येणार आहे. तर काही राशींना करियरमध्ये चांगली संधी मिळणार आहे. जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.

मेष रास

धनाढ्य योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी उत्पन्नाच्या घरात शनी आणि शुक्राचा संयोग होणार आहे. तुमच्या संक्रमण कुंडलीत शुक्र धन आणि व्यवसायाचा कारक आहे. यावेळी अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. या काळात तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांसाठी धनाढ्य योग तयार होऊ शकणार आहे. या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुमचं प्रेम प्रकरण किंवा प्रेमविवाह होणार आहे. जे लोक कला क्षेत्राशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहणार आहे. यावेळी व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो.

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी शनी आणि शुक्र यांच्या संयोगाने तयार होणारा धनाढ्य योग फायदेशीर ठरू शकणार आहे. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. पैशाचे अनेक स्त्रोत निर्माण होऊ शकतात. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील अवैध दारूसाठ्यावर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

Tea vs Coffee Time : सकाळी उठल्या उठल्या चहा पिताय? आताच थांबवा ही सवय; जाणून घ्या योग्य वेळ

मोठी बातमी! बड्या नेत्याची भाजपने केली तडकाफडकी पक्षातून हकालपट्टी, महाराष्ट्रात खळबळ

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

Nashik Earthquake : नाशिक पुन्हा हादरलं! एकापाठोपाठ ३ तालुक्यांमध्ये दोनदा बसले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

SCROLL FOR NEXT