Shani Gochar 2025 saam tv
राशिभविष्य

Shani Gochar : शनीच्या राशी बदलाने साडेसाती आणि ढैय्याचा प्रभाव; 'या' राशींचा कठीण काळ होणार सुरु, धनहानीसोबत आरोग्यही बिघडणार

Shani Gochar 2025: शनिदेव सुमारे अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. ज्यावेळी शनिदेवाचं गोचर होतं तेव्हा शनीच्या साडेसती आणि धैय्याचा काळ काही राशींवर संपतो आणि काही राशींवर सुरू होतो.

Surabhi Jayashree Jagdish

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाला एक विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. यामध्ये कर्मदाता शनी देवाला देखील महत्त्व देण्यात आलं असून तो सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. शनिदेवाला न्याय देणारा, न्यायाधीश आणि कर्म देणारा मानलं जातं. शनिदेव मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत. शनिदेव सुमारे अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. ज्यावेळी शनिदेवाचं गोचर होतं तेव्हा शनीच्या साडेसती आणि धैय्याचा काळ काही राशींवर संपतो आणि काही राशींवर सुरू होतो.

पुढच्या महिन्यात म्हणजेच २९ मार्च रोजी शनिदेव कुंभ राशी सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे काही राशींवर साडेसती आणि धैयाचा प्रभाव सुरू होणार आहे. अशामध्ये काही राशींच्या लोकांचं आर्थिक नुकसान आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. अशामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चमध्ये शनी आपल्या कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीच्या लोकांना मीन राशीत प्रवेश करताच साडेसातीच्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीची सुरुवात होणार आहे. मीन राशीवर साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्याचा परिणाम होऊ शकतो.

२०२५ मध्ये शनीच्या मीन राशीत भ्रमणामुळे वृश्चिक राशीवरील शनीचा धैय्या संपून धनु राशीवर सुरू होणार आहे. याशिवाय कर्क राशीवरील कंटक शनीचा प्रभावही संपणार आहे. तर दुसरीकडे सिंह राशीवरील धैयाचा प्रभाव सुरू होणार आहे.

ज्योतिष दिनदर्शिकेनुसार, शनिदेव मेष राशीच्या गोचर कुंडलीतील दहाव्या आणि अकराव्या घराचे स्वामी असणार आहेत. यामुळे मेष राशीला साडेसती सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे शनीची दृष्टी दुसऱ्या, सहाव्या आणि नवव्या भावावर पडणार आहे. यामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे बजेट बिघडण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही जास्त प्रवास कराल. या काळात पैशाचे नुकसान देखील होऊ शकतं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नंदूरबारमधील स्कूल बस अपघातात मृत्यूचा आकडा वाढला

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

SCROLL FOR NEXT