Navpancham Rajyog: शनी-मंगळ बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींना मिळणार छप्परफाड पैसा, प्रत्येक कामात यश

Navpancham Rajyog 2025: सध्या शनि कुंभ राशीत आहे. यासोबतच, होळीनंतर शनी मंगळासोबत नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे. यामुळे काही राशींचं आयुष्य सुखकर होणार आहे.
Navpancham Rajyog
Navpancham Rajyogsaam tv
Published On

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक अंतरानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा राजयोगांची निर्मिती होते. सध्या शनि कुंभ राशीत आहे. यासोबतच, होळीनंतर शनी मंगळासोबत नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे. यामुळे काही राशींचं आयुष्य सुखकर होणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, ५ एप्रिल रोजी सकाळी ६:३१ वाजता शनी आणि मंगळ एकमेकांपासून १२० अंशांवर असणार आहे. यामुळे नवपंचम राजयोगाची निर्मिती होणार आहे. या राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशीच्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. तर काही राशीच्या लोकांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. होळीनंतर निर्माण होणारा नवपंचम राजयोग कोणत्या राशींना लाभदायक ठरणार आहे ते पाहूयात.

Navpancham Rajyog
Maha Shivratri 2025: महाशिवरात्रीला बनणार विशेष योग! 'या' राशींवर शंकराची कृपा, तिजोरीत भरपूर पैसा येण्याची शक्यता

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीखाली जन्मलेले लोक प्रवास देखील करू शकतात. यातून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकतात. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पालकांचं पूर्ण सहकार्य मिळेल.

Navpancham Rajyog
Surya Gochar: सूर्याच्या गोचरमुळे 'या' राशींच्या अडचणीत वाढ; ताण वाढणार, पैशांचं नुकसान होण्याची शक्यता

सिंह रास

मंगळ आणि शनीचा नवपंचम राजयोग या राशीच्या लोकांनाही आनंद देऊ शकणार आहे. तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकतो.

Navpancham Rajyog
Mangal Margi: 24 फेब्रुवारी रोजी मंगळ चालणार सरळ चाल; 'या' राशींवर होणार वाईट परिणाम, मोठ्या नुकसानीची शक्यता

कन्या रास

या राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच असू शकतो. या राशीचे लोक त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतील. यासोबतच, तुमचे काम पाहून वरिष्ठ अधिकारी खूश होऊ शकतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला अतिरिक्त जबाबदारी दिली जाऊ शकते. समाजात आदर आणि सन्मान वेगाने वाढू शकतो.

Navpancham Rajyog
Trigrahi Yog: एकाचवेळी तयार झाले 2-2 त्रिग्रही योग; 'या' राशींना श्रीमंत होण्यापासून रोखणं कठीण, पैशांचा होणार पाऊस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com