
वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या बदलाचा परिणाम प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर होत असतो. दरम्यान वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी होणार आहे. या वर्षी होळीचा सण १४ मार्च २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजेच १४ मार्च रोजी सकाळी ९:२९ वाजता सुरू होणार असून दुपारी ३:२९ वाजता संपणार आहे.
हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे म्हणून सुतक काळ वैध राहणार नाही. ग्रहणाच्या वेळी चंद्र कन्या राशीत आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असणार आहे. कन्या राशीत केतु ग्रहण आधीच अस्तित्वात आहे. त्यामुळे दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे ग्रहण योग तयार होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे काहींना फायदा होणार आहे. तर काहींना सावध राहण्याची गरज आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.
या राशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात काही समस्या येऊ शकतात. अशा परिस्थितीत, सुविधांमध्ये झपाट्याने घट दिसून येते. घरात एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही प्रकारच्या तणावाचा सामना करावा लागू शकतो.
या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण फारसं फायदेशीर ठरणार नाही. या राशीच्या लोकांना मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारकिर्दीतही काही अडथळ्यांना तोंड द्यावं लागू शकतं. मोठं नुकसान होऊ शकते. कोर्टाच्या केसेसमध्ये तुम्ही फसण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं. एखाद्या छोट्या कामात तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. हे ग्रहण बाराव्या घरात होणार आहे. या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचा अभाव दिसून येऊ शकतो. आरोग्याबद्दल थोडं सावध राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं खूप नुकसान होण्याची शक्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.