horoscope  Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

saturday Horoscope in marathi : आज काही राशींच्या लोकांना कष्टाचं मिळेल. तर काहींना यश प्राप्ती होईल.

Anjali Potdar

आजचे पंचांग

शनिवार,२६ जुलै २०२५,श्रावण शुक्लपक्ष.

तिथी-द्वितीया २२|४२

रास-कर्क १५|५२ नं. सिंह

नक्षत्र-आश्लेषा

योग-व्यतिपात

करण- बालव

दिनविशेष-व्यतिपात वर्ज्य

मेष - आपल्याला धावपळीची विशेष आवड आहे. आज असाच काहीसा दगदागीचा दिवस राहील. नवीन वाहनांचे खरेदीचे नियोजन असेल तर आज ते सत्यात उतरतील. जमिनीचे व्यवहार सुद्धा पार पडतील. दिवस चांगला आहे.

वृषभ - संतती पासून लाभ होतील व्यवसायामध्ये प्रगती होईल. करिअरच्या ठिकाणी मात्र घेतलेले कष्ट तसे पूर्णत्वाला जाणार नाही. त्यामध्ये अडचणी निर्माण होतील. पण सगळ्यांशी दोन हात करून पुढे जाल.

मिथुन - जळी,स्थळी, पाषाणी व्यवहार आणि पैसा असेच आजकाल युग चालू आहे. आपणही याला अपवाद नाही. आज पैसे मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न कराल आणि तसे मिळवायलाही, धनयोगाला दिवस उत्तम आहे .

कर्क - आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला आवडते. कुटुंबीयांशी प्रेमाचे संबंध ठेवायला आवडतात पण आज काही वेगळं करावसं वाटेल. एकटेपणामध्ये आनंद शोधाल. सकारात्मकता वाढीला लागेल.

सिंह - आनंदावर विरजण पडण्याच्या अनेक गोष्टी असतात. आज काही ठराविक गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. ज्याच्यामुळे आपले मनोबल कमी होईल.मोठी नियोजन केलेल्या गोष्टींमध्ये अपयश येऊ शकेल.

कन्या - आनंदासाठी जगायचे असते असे आपल्याला नेहमीच वाटते. आपण मन आणि बुद्धी याचा कौल घेऊन आज वागणार आहात. जवळच्या लोकांना बरोबर घेऊन जाल.जुने मळभ निघून पडतील .

तूळ - रसिकता वाढीला लागेल. कामाच्या ठिकाणी जीव ओतून काम कराल.अर्थात ते वाया जाणार नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या कडून विशेष मदत मिळेल. एकत्रित या सांघिक कामाचा आनंद घ्याल.

वृश्चिक - कुलस्वामिनीची उपासना लाभदायी ठरणार आहे. जे कराल ते श्रद्धेने कराल. तीर्थक्षेत्र भेटी सुद्धा होतील. दान, दानत आणि उदारताकडे कला ठेवल्यास आज दिवस उत्तम राहील .

तूळ - रसिकता वाढीला लागेल. कामाच्या ठिकाणी जीव ओतून काम कराल.अर्थात ते वाया जाणार नाही. आपल्या सहकाऱ्यांच्या कडून विशेष मदत मिळेल. एकत्रित या सांघिक कामाचा आनंद घ्याल.

मकर - कष्टाला आज दुसरा पर्याय नसणार आहे. पण दुधात साखर म्हणजे केलेल्या कष्टाचे द्विगुणित फळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे .एकत्रितरित्या तुम्ही आणि तुमचे व्यावसायिक भागीदारीत कामे कराल. आणि यश खेचून आणाल.

कुंभ - तब्येतीच्या तक्रारी एवढ्यात आपल्या वाढल्या आहेत. आजचा दिवस त्यालाही अपवाद नाही ताण कमी करून शरीर स्वास्थ्यावर लक्ष द्यावे लागेल.शत्रूंचे काम त्यांना करू दे. तुम्ही तुमचे काम करावे.

मीन - आपल्या पेक्षा एक पाऊल पुढेच अशी आपली संतती आहे. त्यांच्याकडून प्रगतीचे अनेक संदेश येतील. कामाला गती येईल. हसऱ्या वातावरणामध्ये दिवस पार पडेल. मेहनतीने पुढे जाल.सद्गुरूंची कृपा राहील .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ- नांदेड 'या' दोन जिल्ह्याचा संपर्क तुटला, पैनगंगा नदीला पूर

Sharad Pawar : मुंबईत ४०-५० मजली इमारती; त्यात मराठी माणूस कुठेच दिसत नाही; शरद पवारांनी काढलं नवं कार्ड?

अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

GST Reforms: दूध, दही, टीव्ही, फ्रिज होणार स्वस्त? मोदी सरकार देणार गिफ्ट

६-७-८-९ नाही, १० थरांचा विश्वविक्रम; जय जवान पथकाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणारं कोकण नगर गोविंदा पथक नेमकं कुठलं?

SCROLL FOR NEXT