
जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकानं १० थरांचा विक्रम रचला.
दहीहंडी २०२५ मध्ये पहिल्यांदाच इतका उंच मानवी मनोरा उभारला गेला.
विवेक कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हे यश मिळवलं.
या विक्रमामुळे मुंबईत आणि महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण आहे.
ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम, गोविंदा रे गोपाळा. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा जल्लोष शिगेला पोहोचला आहे. गोविंदा पथके उंचच उंच मनोरे रचण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच जोगेश्वरी येथील कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थरांचा अभूतपूर्व मनोरा रचत नवा विश्वविक्रम रचला आहे.
ठाण्यातील वर्तकनगर भागात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहींहडी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सकाळपासूनच मुंबई, ठाणे परिसरातील विविध गोविंदा पथकाने ९ थर रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुपारीच जोगेश्वरी येथील कोकण नगर पथकानं तब्बल १० थर रचून विश्वविक्रम रचला.
कोकण नगर गोविंदा पथकाबाबत माहिती
विश्वविक्रम रचणारे पथक जोगेश्वरी येथील कोकण भागातील असल्याची माहिती आहे. विवेक कोचरेकर हे या पथकाचे प्रशिक्षक आहेत. गेल्या १२ वर्षांपासून हे पथक कार्यरत असून, आपल्या शिस्तपद्धतीसाठी ओळखले जातात.
आज त्यांनी १० थर रचून विश्वविक्रम रचला. २०१२ साली ७ थर लावण्यास सुरूवात केली होती. नंतर आठ थर लावले. २०१५ साली जय जवान, ताडवाडी गोविंदा पथकाने नऊ थर लावले. आता कोकण नगर गोविंदा पथकानेही अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने १० थर रचून विश्वविक्रम रचला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.