Kitchen Vastu Tips: किचनमधील 'या' गोष्टीमुळे होतो वास्तुदोष, घरात वाढते नकारात्मक उर्जा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाकघरातील वास्तुदोष

स्वयंपाकघर हा घराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतो. वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील नकारात्मक ऊर्जा घरात अनेक समस्या निर्माण करू शकते.

kitchen | yandex

स्वयंपाकघराची योग्य दिशा

स्वयंपाकघरासाठी वास्तुशास्त्रानुसार, सर्वात शुभ दिशा आग्नेय आहे. या दिशेचा स्वामी अग्नि देव आहे, जो ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे. चुकीच्या दिशेने स्वयंपाकघर असल्याने घरात नकारात्मकता वाढते.

kitchen | yandex

सकारात्मक उर्जा

दक्षिण- पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असल्याने सकारात्मक ऊर्जा येते, ज्यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. जर स्वयंपाकघर योग्य दिशेला नसेल तर वास्तु दोष कमी करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.

Kitchen | canva

गॅस स्टोव्हची जागा

गॅस स्टोव्ह स्वयंपाकघराच्या दक्षिण- पूर्व कोपऱ्यात ठेवावा, जेणेकरून स्वयंपाक करताना व्यक्तीचे तोंड पूर्वेकडे असेल.

kitchen | freepik

पाणी आणि अग्नि

स्वयंपाकघरात सिंक, वॉटर फिल्टर आणि गॅस स्टोव्ह एकमेकांच्या खूप जवळ ठेवू नयेत. हे दोन्ही विरुद्ध घटक आहेत आणि त्यांच्या संघर्षामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

kitchen | yandex

लाईट रंगांचा वापर

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात हलके रंग वापरावेत, जसे की क्रीम, हलका पिवळा किंवा नारंगी. किचनमध्ये नैसर्गिक प्रकाश असणे देखील महत्त्वाचे आहे.

kitchen | yandex

कचरा

कचराकुंडी स्वयंपाकघराच्या वायव्य किंवा नैऋत्य कोपऱ्यात ठेवावी. ती कधीही स्वयंपाकघराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा स्वयंपाक क्षेत्राजवळ ठेवू नये.

kitchen | yandex

NEXT: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? तर 'या' महत्वाच्या गोष्टी विसरु नका

Solo Trip | yandex
येथे क्लिक करा