ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ओळखपत्रे, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, तिकिटे, प्रवास आणि विमा इत्यादी गोष्टी ट्रॅव्हल किटमध्ये ठेवा,जेणेकरून प्रवास आरामदायी होईल.
परदेशात प्रवास करताना स्थानिक चलन म्हणजेच लोकल करेंसी सोबत असणे महत्वाचे आहे. यासोबतच, तुमचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड नेहमी सोबत ठेवा.
तुमच्या आरोग्याच्या स्थितीनुसार कीटमध्ये ताप, खोकला, डोकेदुखी, उलट्या यासाठीचे औषधे ठेवा.
तुमच्या ट्रॅव्हल किटमध्ये फोन चार्जर, पॉवर बँक, कॅमेरा आणि अॅडॉप्टर नक्की ठेवा.
तसेच क्रीम, डीओ, मॉस्किटो रिपेलंट, टूथपेस्ट, टिश्यू पेपर, शॅम्पू आणि फेस वॉश यासारख्या आवश्यक वस्तू ठेवा.
ट्रॅव्हल किटमध्ये नेक पीलो, स्लीप मास्क आणि ईअर मफ यासारख्या गोष्टी नक्की ठेवा. किटमध्ये ड्राय स्नॅक्स, चॉकलेट आणि प्रोटीन बार देखील सोबट ठेवा.
प्रवास करताना तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट आणि काही चांगले पुस्तके देखील ठेवू शकता.