
सचिन जाधव, साम टीव्ही
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील राजकीय वातावरण तापलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई आणि मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या वादात शरद पवारांनीही उडी मारली आहे. मुंबईतील ४०-५० मजली इमारतीत मराठी माणूस कुठेच दिसत नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्याचा राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.
पुण्यात किशोर पवार यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार,बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी गिरणी कामगार आणि चळवळीच्या आठवणीला उजाळा दिला. शरद पवार म्हणाले, 'आजचा हा कार्यक्रम साखर व्यवसायातील व्यक्तीचा सन्मान आहे. पूर्ण आयुष्य कामगार चळवळीत घालवलं. अनेक प्रश्न चळवळी केल्या. आमच्या पिढीने कुठे ना कुठे हादरा देण्याचे काम केले'.
'अहिल्यानगर जिल्हा जुन्या काळात गाजलेला जिल्हा होता,साखर चळवळ सुरू झाली. सहकार आणि खाजगी असे अनेक साखर कारखाने होते. कामगार हिताचे प्रश्न आले की नेतृत्व उभं राहिले. त्यात साथी किशोर पवार यांचे नाव पुढे येते, मी नववीला प्रवरानगरातील शाळेत शिकलो. एक वर्ष शिकलो. त्यातील अनेक विद्यार्थी चळवळीत असायचे. त्यातून सत्याग्रह करण्याची सुरुवात झाली'.
'माझ्या आयुष्यातील सर्वात पाहिला मोर्चा प्रवरानगरमध्ये काढला. कारखाना बंद करायला सांगायला गेलो. महाराष्ट्र सीमा प्रश्नाबाबत एकीकडे समिती स्थापना झाली. किशोर पवार सेक्रेटरी. सत्याग्रह करायचे ठरले. बेळगावमध्ये जाऊन सत्याग्रह करायचे आहे. पण आम्हाला अटक होणार असे माहिती होती, त्यात माझे नाव...बेळगाव जाताना मी गाडी चालवत होतो. तेव्हा पोलिसांना चुकवत सत्याग्रह करण्यासाठी पोहचलो, अशी आठवण त्यांनी सांगितली.
'आमच्यावर लाठीहल्ला झाला, त्यात आम्हाला पण लाठ्या पडल्या. लाठ्या पडल्यावर काय होतं, तुम्ही सगळे चळवळीतील आहेत, तुम्हाला माहिती आहे. बेळगावमध्ये पुन्हा छगन भुजबळ यांनी चळवळी घेऊन सत्याग्रह करण्यासाठी गेले. त्यानी पोलिसांना होम गार्ड आहे म्हणून फसवून गेले. त्यांना तीन महिने शिक्षा भोगावी लागली, असेही छगन भुजबळ यांनी सांगितलं.
'आजपर्यंत मी नेहमी कामगार आणि सरकार याच्यांमधील मध्यस्थी भूमिका घेतली. साखर कामगार आजपर्यंत संघर्ष करत आले, त्यांचे अनेक प्रश्न सोडवले. आज देशात साखर व्यवसाय महत्वाचा आहे. एकवेळ राज्यात कापड गिरणी होत्या. मुंबईमध्ये अनेक गिरणी होत्या. 200 गिरण्या होत्या. यात चळवळ महत्वाची भूमिका होती. म्हत्वाची भूमिका किशोर पवार यांची होती, असे शरद पवारांनी सांगितले.
'आज वाईट वाटते की, आज गिरणी मुंबईत दिसत नाहीत. माणसे नाहीत. चाळीस-पन्नास मजली इमारती दिसतात. त्या ठिकाणी मराठी माणूस कुठेच दिसत नाही. आज कामगारांची पिळवणूक होत असेल तर विचार करावे लागेल. आज साखर सहकारी साखर कारखाने कमी झाले. खासगी कारखाने झाले आहेत. कमी लोकांमध्ये काम चालले पाहिजे, असे झाले आहे. कारखाने सुरू राहिले पाहिजेत. कामगार पण टिकले पाहिजेत. आज जगात साखर व्यवसायात दोन नंबर आपला देश आहे, अशी माहिती देखील शरद पवारांनी सांगितली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.