Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

japan human washing machine : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपानने पुन्हा एकदा नविन आविष्कार घडवलाय. जपानने एक अशी वॉशिंग मशीन बनवलीय जी चक्क माणूसच धुवून काढते. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत.. ही वॉशिंग मशीन नेमकं काम कशी करते..पाहूयात हा रिपोर्ट
japan human washing machine
human washing machineSaam tv
Published On

सध्या अनेकांच्या घरात वॉशिंग मशिन पाहायला मिळते. एकदा मशिनमध्ये कपडे टाकले की पुढच्या काही मिनिटांमध्ये ते धुवून आणि वाळून बाहेर येतात. पण जपाननं याहीपुढे जाऊ विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक अनोखा आविष्कार घडवलाय जपाननं चक्क माणूस धुणारी वॉशिंग मशीन बनवलीय. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र हे अगदी खरं आहे. ही वॉशिंग मशीन पाहा..ओसाका इथल्या सायन्स कंपनीनं ही वॉशिंग मशीन बनवलीय. ज्यात माणसाला टाकलं की 15 मिनिटांत माणूस अगदी फ्रेश होऊ बाहेर पडतो.

माणूस धुणारी वॉशिंग मशिन

मिराई निनगेन सेंताकुकी असं या वॉशिंग मशिनचं नाव आहे. ही वॉशिंग मशिन एआय तंत्रज्ञानावर आधारित असून ती केवळ 15 मिनिटांत माणसाला अंघोळ घालून, शरीर सुकवून पूर्णपणे ताजेतवानं करते. या पारदर्शक कॅप्सूलमध्ये बसल्यावर, हायस्पीड वॉटर जेटस् आणि सूक्ष्म बुडबुड्यांच्या साहाय्याने त्वचेची स्वच्छता केली जाते. हे बुडबुडे फुटल्यावर निर्माण होणार्‍या दाबामुळे त्वचेतील घाण बाहेर फेकली जाते. यासाठी कोणत्याही रसायनांची गरज नाही यात बसवलेले सेन्सर्स हृदयाचे ठोके आणि शरीराचं तापमान मोजतात, ज्याच्या आधारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाण्याचं तापमान नियंत्रित करते.

japan human washing machine
Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

कोणत्या व्यक्तीला कशी ट्रीटमेंट हवीय त्यानुसार या मशिनमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कुणाला समुद्राच्या लाटा अनुभवायच्या असतील किंवा एखाद्याला शांत संगीत ऐकायचं असेल तर ते संगीत ऐकवून मानसिक आरामही दिला जातो. ही मशीन केवळ शरीराची स्वच्छताच करत नाही तर माणसाच्या मानसिक आरोग्याचाही विचार करते.

japan human washing machine
Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

भविष्यात अनेक आजारांवर प्रभावी उपचार करण्यासाठी या मशिनचा उपयोग होऊ शकतो असा मशिन बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन आणि जपान कायमच पुढे राहिले आहेत. लोकसंख्या आणि आकारमानाच्या बाबतीत जपान भलेही इवलासा देश असला तरी विज्ञानाचे नवनवीन आविष्कार घडवण्यात जपान नेहमीच अग्रेसर राहिलाय. आता जपानच्या नव्या तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्राला कसा फायदा होते, तेच पाहावं लागेल.

japan human washing machine
Maharashtra Rain Update : छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीत ढगफुटी; अनेकांचे संसार रस्त्यावर, बळीराजाच्या डोळ्यातही अश्रू,VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com