Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

Nitesh Rane News : मंत्री नितेश राणे यांनी वाळू माफियांना मोठा इशारा दिला आहे. वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे, असे राणेंनी म्हटलं.
Nitesh Rane News
Nitesh Rane Saam tv
Published On

नितेश राणे यांची वाळूचोरीवर कठोर भूमिका

सिंधुदुर्गात पालकमंत्री म्हणून नितेश राणेंचं पहिल्यांदा स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण

गोकुळाष्टमीला मटण पार्टीवरून राणेंचा जितेंद्र आव्हाडांना टोला

महायुती सरकार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं राणेंकडून स्पष्टीकरण

विनायक वंजारे, साम टीव्ही

सिंधुदुर्ग : राज्यातील वाळूचोरीवरून मंत्री नितेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे. वाळूचोरीबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अनधिकृत वाळू उपशावर कारवाई होणार, असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे. ते सिंधुदुर्गात बोलत होते.

Nitesh Rane News
India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभीमीवर पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नितेश राणे यांनी नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याच्या विकासासाठी आमचं महायुतीचे सरकार नेहमीच कटीबद्द आहे, असेही त्यांनी सांगितले.

Nitesh Rane News
Maharashtra Politics : आंबेडकर-गांधी एकत्र लढणार? लोकशाही वाचवण्यासाठी 'वंचित'चं राहुल गांधींना पत्र, VIDEO

सिंधुदुर्गातील पहिल्या ध्वजारोहणाबाबत नितेश राणे म्हणाले, 'पालकमंत्री म्हणून आज पहिल्यांदा स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण केले. हा आपल्यासाठी भावनिक क्षण आहे. लहानपणी वडिलांना ध्वजारोहण करताना पाहिलं. आज तेच करायची संधी मिळाली. माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. पण जबाबदारी देखील वाढली आहे'.

Nitesh Rane News
Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

मटण पार्टीवरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले, 'आज हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे. स्वातंत्र्य दिन आणि आज गोकुळाष्टमी आहे. आज जे हिंदूद्वेषी आहेत, तेच मटण पार्टी करणार आहेत. स्वतःला हिंदू का म्हणवून घेता, आमचं धर्मांतर झालंय असं सांगून टाका. जिहादी मानसिकतेचे हे लोक आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com