Shocking : धक्कादायक! ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू, पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ

pimpri chinchwad news : पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या घटनेने तिन्ही कामगारांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
pimpri chinchwad news
pimpri chinchwadSaam tv
Published On

पिंपरी-चिंचवडमधील निगडी प्राधिकरणात ३ बीएसएनएल कामगारांचा मृत्यू

केबल दुरुस्तीसाठी ड्रेनेजमध्ये उतरले असताना दुर्घटना घडली.

एक कामगारावर लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु.

स्वातंत्र्यदिनी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ

पिंपरी-चिंचवडमध्ये एकीकडे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा साजरा केला जात आहे. दुसरीकडे ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेने पिंपरी-चिंचवडमध्ये परिसरात खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील निगडीत केबल टाकण्यासाठी ड्रेनेज लाइनमध्ये उतरलेल्या ३ कामगारांचा मृत्यू झालाय. तिघेही कामगार हे 'बीएसएनएल' कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिघांवर काळाने घाला घातला आहे. तिघांच्या मृत्यूने या कामगारांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

pimpri chinchwad news
Shocking : कोचिंग क्लासमधील मुलीवर नराधमाची वाईट नजर; शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ

नेमकं काय घडलं?

पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरणात ड्रेनेज पाईप लाइनमधून केबल टाकत असताना दुर्दैवी घटना घडली. ड्रेनेज लाइनमध्ये विषारी वायू गळती झाल्यामुळे काम करणाऱ्या 3 कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

pimpri chinchwad news
Maharashtra Politics : आंबेडकर-गांधी एकत्र लढणार? लोकशाही वाचवण्यासाठी 'वंचित'चं राहुल गांधींना पत्र, VIDEO

निगडी प्राधिकरणातील या दुर्देवी दुर्घटनेत ३ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एक कामगार लोकमान्य हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. बीएसएनएलच्या केबल दुरुस्तीसाठी हे कामगार ड्रेनेजच्या झाकणातून खाली उतरले होते. त्याचवेळी ही दुर्देवी दुर्घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com