Shocking : कोचिंग क्लासमधील मुलीवर नराधमाची वाईट नजर; शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ

bihar shocking : शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणी तिघांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.
teacher student viral video
bihar shocking newsSaam tv
Published On

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील जयनगरमध्ये एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षक आणि विद्यार्थिनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे.

पीडित तरुणीच्या जबाबावरून शिक्षकासहित तिघांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी अमित कुमार यांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

प्राथमिक माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही राकेश कुमार नावाच्या शिक्षकाच्या कोचिंग क्लासला जायची. याच कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीला एकटं असल्याचं गाठून शिक्षकाने अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. पीडित विद्यार्थिनीने या विषयी कोणालाच काही सांगितलं नव्हतं. कोचिंग क्लास असलेल्या घराचा मालक कुलदिप आणि सोनू या दोघांकडूनही विद्यार्थिनाला सतत त्रास दिला जायचा.

teacher student viral video
Voter List Scam : हा तर मोठा घोटाळा! मतदार यादीत एकाच महिलेचं ६३ वेळा नाव; कुठे झाला घोळ?

पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितलं की, 'या दोघांनी विद्यार्थिनीला सांगितलं की, शिक्षकाचा व्हिडिओ बनवुयात. त्यानंतर त्याच्याकडून २० लाख रुपये वसूल करुयात. काही दिवसांपूर्वी कोचिंग क्लासवरून घरी जाताना मालक कुलदीप आणि सोनूने बळजबरीने पकडलं. त्यानंतर मला बंदुकीचा धाक दाखवला. शिक्षकासोबत अश्लील व्हिडिओ करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मी रुममध्ये गेल्यानंतर मोबाईलचा कॅमेरा सुरु केला'.

teacher student viral video
Beed Crime : बीडमध्ये गुंडाराज सुरूच! ५० हजारांसाठी कंत्राटदाराला मारहाण; व्हिडीओ फोटोंसह पुरावे दिले

व्हिडिओ व्हायरल प्रकरणी पोलिसांनी अनेक सोशल मीडिया, युट्यूब चॅनल आणि न्यूज चॅनलच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे. विद्यार्थिनीला बळजबरीने व्हिडिओ तयार करायला लावणाऱ्या दोघांवर कठोर कारवाई करण्यास पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे.

teacher student viral video
Meat Ban Row : १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी; विरोधकांकडून चिकन बिर्याणी आणि मटण कुर्मा पार्टी, कधी अन् कुठे?

जालन्यात वासनांध भावाचा बहिणीवर अत्याचार

जालन्यातून खळबळजनक घटना घडली आहे. जालन्यात सात वर्षीय चिमुकलीवर सख्ख्या चुलत भावाने अत्याचार केल्याची घटना घडलीये. नवीन जालना भागात 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com