Voter List Scam : हा तर मोठा घोटाळा! मतदार यादीत एकाच महिलेचं ६३ वेळा नाव; कुठे झाला घोळ?

Voter List Scam News : मतदार यादीत एकाच महिलेचं ६३ वेळा नाव आढळले आहे. पालघरमध्ये हा प्रकार घडला आहे.
Voter List Scam
Voter List Scam NewsSaam tv
Published On

मनोज तांबे,साम टीव्ही

चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीच्या घोटाळ्यानंतर पालघरमधील घोळ उघडकीस आला आहे. चंद्रपुरात एकाच घरात 119 मतदार दाखवल्याचा प्रकार ताजा असताना पालघरमध्ये एका महिलेचं मतदार यादीत 63 वेळा नाव समोर आलं आहे. माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी हा गंभीर आरोप केला आहे.

नालासोपारा विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये सुषमा गुप्ता असे या महिलेचे सहा वेळा नाव आले असले, तरी वसई विरारमध्ये एकाच व्यक्तीचे तब्बल 63 वेळा नाव वेगवेगळ्या ठिकाणी आले आहेत, असा गंभीर आरोप माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

Voter List Scam
Fact check : 'मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटो...'; काय आहे FB पोस्टमागचं सत्य? जाणून घ्या

वसई विरारमध्ये पूजा सिंग या महिलेचे ६३ वेळा नाव आलं आहे. तर अभिषेक सिंग नावाच्या व्यक्तीचे ४७ वेळा नाव आले आहे. तर सुनील यादव याचे ५३ वेळा नाव आले आहेत. या लोकांची नावे कुठून आली, याबाबत माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

Voter List Scam
Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

चंद्रपूर एकाच घरात दाखवले 119 मतदार

चंद्रपुरातील घुग्गुस गावात एकाच घरात 119 मतदारांची नोंद सापडली. परंतु या घरी केवळ दोन मतदार आहेत. घुग्गुस हे ग्रामपंचायत असलेलं औद्योगिक गाव असून सचिन बांदुरकर यांचे 350 क्रमांकाचे घर आहे. या घरातून तब्बल 119 जणांची नोंदणी झाली आहे.

Voter List Scam
Meat Ban Row : १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी; विरोधकांकडून चिकन बिर्याणी आणि मटण कुर्मा पार्टी, कधी अन् कुठे?

एका लहानशा घरात एवढ्या मतदारांची नोंद कशी काय करण्यात आली, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आयोगाच्या यादीनुसार तपासणी केल्यानंतर घोटाळा समोर आला. या घोटाळ्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com