Fact check : 'मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटो...'; काय आहे FB पोस्टमागचं सत्य? जाणून घ्या

Facebook Viral Post : फेसबुकवर एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या FB पोस्टमागचं सत्य जाणून घ्या.
Facebook Viral Post
Fact check : Saam tv
Published On

Viral facebook Post: फेसबुकवर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये युजर्स फेसबुकला फोटो आणि वैयक्तिक माहिती वापरण्यास परवानगी नसल्याचे सांगत आहे. तसेच युजर्स मजकूर कॉपी-पेस्ट करून शेअर करण्यासही सांगत आहे. तुम्ही पोस्ट केली नाही,तर तुमची संपूर्ण माहिती वापरण्याचा कायदेशीर अधिकार मिळेल, असा दावा पोस्टमधून करण्यात येत आहे. फेसबुकवरील हा संदेश झपाट्याने व्हायरल होत आहे. या व्हायरल पोस्ट मागचं सत्य जाणून घेऊयात.

Facebook Viral Post
Independence Day 2025 : लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राज्यातील 15 सरपंचांचा सन्मान होणार; कुणाला मिळाला मान?

फेसबुकवर व्हायरल होणाऱ्या पोस्ट २०२४ आणि २०२५ साली देखील व्हायरल झाल्या होत्या. हिंदी, मराठीसह सर्व भाषेत फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. मात्र, फेसबुक किंवा मेटाने कोणताही नियम जाहीर केलेला नाही. त्यामुळे ही पोस्ट अफवा असल्याचे स्पष्ट झालं आहे.

फेसबुकवर अकाऊंट तयार करताना यूजर फ्लॅटफॉर्मच्या अटी आणि शर्ती स्वीकारतो. फेसबुक कोणता डेटा गोळा करेल आणि त्याचा वापर कशा प्रकारे केला जाईल, याची माहिती दिली आहे. तुम्हाला फेसबुकच्या अटी सेटिंग्जमधील 'टर्म्स आणि कंडिशन्स' विभागात वाचायला मिळतात. तसेच कोणतीही पोस्ट रद्द करण्याचाही फेसबुकला अधिकार आहे.

फेसुबक तुमचं नाव, तुमच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्ट, ग्रुप्स, जन्मतारीख, तुमच्या वापराची पद्धत, मोबाईलमधील माहिती( ऑपरेटिंग सिस्टीम, बॅटरी लेव्हल, नेटवर्क , ब्राउझर, लोकेशन) गोळा करते. तुमच्या फिचर्सविषयी आवडी निवडी देखील कळतात.

Facebook Viral Post
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जीवाला धोका, कोर्टात दिली खळबळजनक माहिती

तुम्ही फेसबुकच्या सेंटिंग्जद्वारे तुमच्या डेटाचा वापर नियंत्रित करू शकता. पण व्हायरल पोस्टमुळे ते शक्य नाही. मात्र, व्हायरल पोस्टमुळे तुमची हॅकर्सकडून ऑनलाइन फसवणूक देखील होऊ शकते. दुसरीकडे या पोस्टची खिल्ली सोशल मीडियावर उडवली जात आहे.

Facebook Viral Post
Stray Dog Issue : मी २५०० भटक्या कुत्र्यांना मारून झाडाखाली गाडलं; आमदाराचा खळबळजनक दावा

फेसबुकवर गोपनीयतेसाठी सेटिंग्जमध्ये जा. त्यात तुमची पोस्ट, फोटो आणि प्रोफाईल माहिती कोणाला पाहता येईल, हे देखील ठरवता येते. यासाठई तुम्हाला 'ऑफ-फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी' बंद करावी लागेल. यामुळे फेसबुक अ‍ॅप्सवरील तुमच्या हालचाली कमी ट्रॅक करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com