
भारत-अमेरिका यांच्यातील व्यापारातील संबंधाचा दुरावा वाढू लागला आहे. तर दुसरीकडे भारताची रशिया आणि चीनशी जवळीक वाढू लागली आहे. भारत-अमेरिका यांच्यातील याच वाढत्या व्यापार तणावावर चीनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि चीन दोन्ही मोठे विकसनशील देश आहेत. दोन्ही देश ग्लोबल साऊथचे सदस्य आहेत.
चीन आणि भारत दोन्ही राष्ट्र एकमेकांना सहकार्य करण्यासाठी पुढे आले आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी म्हटलं आहे की, 'भारत आणि अमेरिकेच्या संबंधात काही मतभेद आणि आव्हाने पाहायला मिळाली'.
'दोन्ही देशातील नेत्यांच्या महत्वपूर्ण सहमतींची अंमलबजावणी करण्यासाठी चीन आणि भारत मिळून काम करण्यास तयार आहे. दोघांमध्ये राजकीय विश्वास वाढवणे, परस्पर संवाद आणि सहकार्य वाढवणे, व्यापक हितसंबंध लक्षात घेऊन मतभेद सोडवण्यावर भर असणार आहे. तसेच शांघाय सहकार्य संघटनासारख्या बहुपक्षीय मंचांवर समन्वय मजबूत करण्याचाही समावेश असणार आहे. लिन यांच्या मते, चीन-भारत संबंधांचा आरोग्यदायी आणि स्थिर विकास साधला जाईल'.
पीएम नरेंद्र मोदी हे ३१ ऑगस्ट रोजी तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहयोग संघटनेच्या शिखर संमेलनात सहभाग नोंदवण्यासाठी ७ वर्षानंतर पहिल्यांदा चीनमध्ये जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींची चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट होण्याची शक्यता आहे.
चीनने मागील आठवड्यात पंतप्रधान मोदींच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. चीनचे पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी म्हटलं होतं की, आम्हाला विश्वास आहे की, 'सर्व पक्षांच्या प्रयत्नामुळे तियानजिन शिखर परिषद एकजूटतेचा आणि सकारात्मक परिणामांचा प्रतीक ठरेल. तसेच शांघाय सहकार्य संघटन उच्च गुणवत्तेच्या विकासाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करेल'. दोन्ही देशांची मैत्री वाढल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.