Pune Police : पुण्यात पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी; मेडिकल चालकाला शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी? VIDEO

Pune Police news : पुण्यात पुन्हा एकदा पोलिसाची दादागिरी पाहायला मिळाली आहे. पोलिसाने थेट मेडिकल चालकाला शिवीगाळ केली. तसेच पोलिसावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
pune police
pune news Saam tv
Published On

pune News : पुण्यात काही पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 'वर्दी'च्या दादागिरीचं भूत डोक्यावर बसलं की काय असा प्रश्न उपस्थितीत होताना दिसत आहे. २ दिवसांपूर्वी पुणे शहरातील वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्याचा कॅब चालकाला मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता शहरातील आणखी एक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने थेट मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर संबंधित पोलिस उपनिरीक्षकासोबत असलेल्या मित्राने मेडिकल चालकाच्या विरोधात तक्रार दिली आहे.

pune police
Fact check : 'मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटो...'; काय आहे FB पोस्टमागचं सत्य? जाणून घ्या

विश्रामबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व घटना पुण्यातील नारायण पेठेत १३ ऑगस्ट रोजी घडली. तसेच ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. विजय सरवार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते चंदन नगर पोलीस स्टेशन येथे परिविक्षाधीन (प्रोबेशनल) पोलीस उपनिरीक्षक म्हणून नेमणुकीस आहेत.

नेमकं काय घडलं?

विश्रामबाग पोलिस ठाण्यात याबाबत मेडिकल चालक महादेव चौरे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजण्याचा सुमारास नारायणन पेठेतील मातोश्री मेडिकल येथे फिर्यादी महादेव चौरे हे मेडिकलमध्ये झाडू मारत होते. यावेळी त्यांच्या दुकानासमोर पोलिस उपनिरीक्षक विजय सरवार जर त्यांच्या मित्रांसोबत थांबले होते.

pune police
Maharashshtra Politics : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे एकाच मंचावर, देवेंद्र फडणवीस राहणार मध्यभागी? राजकीय चर्चांना उधाण

दुकानासमोर उभा राहिलेल्या या लोकांना मेडिकल चालकाने बाजूला होण्यास त्यांनी सांगितले. यातून त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक विजय सरवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या हनुमंत रायकर यांनी फिर्यादी व्यक्तीला मारहाण करत शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. त्याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pune police
Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

दुसऱ्या बाजूला याच प्रकरणात सुमित रायकर यांनी देखील महादेव चौरे यांनी शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली अशी तक्रार दिल्यावरून मेडिकल चालक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com