Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

mumbai Latest News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीने आत्महत्या केली आहे. या तरुणीच्या आत्महत्येचं कारणही समोर आलं आहे.
mumbai Shocking
mumbai Latest NewsSaam tv
Published On
Summary

ओबेरॉय संकुलात आत्महत्येचं सत्र सुरुच

तरुणीने २३ व्या मजल्यावरुन उडी मारून आयुष्य संपवलं

तरुणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ

संजय गडदे,साम टीव्ही

मुंबई : मुंबईच्या आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगावमधील ओबेरॉय संकुलातील इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तरुणीने नैराश्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. तरुणीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.

mumbai Shocking
horrific accident : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना; शाळेचं छत कोसळलं, एका मुलीचा मृत्यू

मुंबईतील ओबेरॉय संकुलातील ही चौथी आत्महत्येची घटना असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नामांकित विद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये ही तरुणी शिक्षण घेत होती. तिचे वडील मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असल्याचं सांगण्यात येत आहे.

mumbai Shocking
Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

तरुणीच्या घरात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोणी नव्हतं. त्यामुळे तरुणीने इमारतीच्या 23व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही शेवटच्या चिठ्ठी लिहिली नव्हती.

तरुणीने इमारतीवरून उडी मारल्यानंतर मागील काही दिवसांपासून तिच्यावर अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. तरुणीच्या मृत्यूनंतर परिसरातील लोकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी आरे पोलिसांत अपमृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

mumbai Shocking
Wall Collapse Tragedy : दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू,आकडा वाढण्याची भीती

मागील सहा महिन्यांत ओबेरॉय संकुलातील विविध इमारतींमधून आतापर्यंत चौघांनी आत्महत्या केली आहे. जुलै महिन्यात अनंत द्विवेदी(२२) या तरुणीने आत्महत्या केली. मे महिन्यात १७ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. नागरिकांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com