horrific accident : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना; शाळेचं छत कोसळलं, एका मुलीचा मृत्यू

horrific Accident Update : राजस्थानमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना घडली आहे. एका ठिकाणी शाळेचं छत कोसळलं आहे. दुसरीकडे घडलेल्या दुर्घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे.
Rajasthan Accident Update
horrific Accident Update Saam tv
Published On
Summary

राजस्थानमध्ये स्वातंत्र्य दिनी दोन शाळांमध्ये छत कोसळल्याच्या दुर्घटना

उदयपूरमधील पीएमश्री शाळेच्या निर्माणाधीन इमारतीत छत कोसळलं

बूंदीच्या खासगी शाळेत फॉल्स सीलिंग कोसळून ५ विद्यार्थी जखमी

या दुर्घटनांमुळे शाळांच्या बांधकाम सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित

राजस्थानच्या बंदी आणि उदयपूर जिल्ह्यात दुर्घटना घडली आहे. बूंदीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना घडली. शाळेचं छत कोसळून विद्यार्थी जखमी झाले. तर उदयपूरमध्ये एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाचा सोहळा सुरु असतानाच बूंदीमध्ये दुर्घटना घडली. विद्यार्थी शाळेच्या आवारात होते. बूंदी शहरातील खासगी शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात ऑडिटोरियमचा फॉल्स सीलिंग कोसळून ५ विद्यार्थी जखमी झाले.

Rajasthan Accident Update
Nitesh Rane : वाळू चोरणाऱ्यांचे हात तोडले पाहिजे; वाळू चोरीवरून मंत्री नितेश राणे आक्रमक

जखमींमध्ये एक मुलगा आणि ४ मुलींचा समावेश आहे. दुर्घटना घडल्यानंतर तातडीने जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रम सुरु असताना सिलिंग फॉल कोसळल्याची माहिती मिळत आहे.

उदयपूरमध्ये शाळेचं छत कोसळलं

राजस्थानच्या उदयपूरमध्ये कोटडा तालुक्यातील पाठूनबाडी गावात निर्माणीन शाळेचं छत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला. तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. दोन्ही मुली बकरी चरण्यासाठी निर्माणाधीन शाळेत घेऊन आल्या होत्या. ही घटना उदयपूरच्या पीएमश्री शाळेच्या निर्माणाधीन भवनात घडली.

Rajasthan Accident Update
Maharashtra Politics : आंबेडकर-गांधी एकत्र लढणार? लोकशाही वाचवण्यासाठी 'वंचित'चं राहुल गांधींना पत्र, VIDEO

बंदी शहारातील घटनेत ५ जखमी

बंदी शहरातील चित्तौड रोडवरील पॉल सिनियर सेकेंडरी शाळेत दुर्घटना घडली. या शाळेत एकूण ३५० विद्यार्थी होते. तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी होते. शिक्षण अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेत ५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना बूंदी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच एका विद्यार्थिनीला डोक्यात दोन टाके पडले आहेत. सर्व पाच विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com