Wall Collapse Tragedy : दर्ग्याची भिंत कोसळली; 5 जणांचा मृत्यू,आकडा वाढण्याची भीती

Wall Collapse in delhi : दर्ग्याची भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Wall Collapse update
Wall Collapse in delhiSaam tv
Published On

दिल्लीतील निजामुद्दीन येथील हुमायू येथील मकबऱ्याजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. दर्गा शरीफ फत्ते शाहच्या आतील खोलीतील भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

दिल्लीच्या अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी दुपारी ३ वाजून ५१ वाजता दर्ग्याची भिंत कोसळल्याची घटना घडली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५ जवान घटनास्थळी पोहोचले. जवानांनी तातडीने बचाव कार्य सुरु केलं. जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

भिंत कोसळून मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे. तर दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत ११ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली ६ ते ७ जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Wall Collapse update
Fake Voter Scam : महाराष्ट्रातही व्होट चोरी? पैठणमध्ये 23 हजार मतदार बोगस? VIDEO

अॅडवोकेट मुजीब अहमद यांनी सांगितलं की, 'आम्ही वक्फ बोर्डाच्या वतीने येथे आलो आहोत. आज झुम्मा असल्याने मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते. या दर्ग्यातील आजूबाजूच्या परिसरात लोक नमाज पठण करण्यासाठी येताता. आज पावसामुळे काही लोक आतल्या खोलीत गेले होते. मात्र, पावसामुळे एका खोलीचं छत देखील जुनं झालं होतं'.

Wall Collapse update
horrific accident : स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात दुर्घटना; शाळेचं छत कोसळलं, एका मुलीचा मृत्यू

'एएसआय'चे कर्मचारी दुरुस्त करून देत नाहीत. अनेकदा दर्ग्याच्या कमिटीने दुरुस्तीसाठी विनंती केली. छतातून पाणी गळत असल्याची अनेकदा तक्रार दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी दुरुस्तीसाठी विनंती केली. मात्र, एएसआयने नकार दिला. त्यांच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली आहे.

'पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. दर्ग्यातील खोलीत सुमारे १५ ते २० लोक होते. या दुर्घटनेत अनेक लोक जखमी झाले आहेत. आधी छत कोसळलं. त्यानंतर भिंत कोसळली, अशी माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com