Fake Voter Scam : महाराष्ट्रातही व्होट चोरी? पैठणमध्ये 23 हजार मतदार बोगस? VIDEO

Maharashtra Voter Scam : महाराष्ट्रात व्होट चोरीचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय... एकाच तालुक्यात 23 हजार बोगस मतदार असल्याचं समोर आलंय... आणि या प्रकरणाचा साम टीव्हीने पंचनामा केलाय.. त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
Maharashtra Voter Scam update
Maharashtra Voter ScamSaam tv
Published On

राहुल गांधींच्या आरोपानंतर महाराष्ट्रातही मतदार याद्यांची पडताळणी सुर कऱण्यात आलीय.. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मतदार यादीतील घोळ उघड झालाय.. त्याचा साम टीव्हीने पंचनामा केलाय..

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांची यादी प्रसिद्ध कऱण्यात आलीय.. याच यादीमुळे निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पडलंय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यादीत 25 हजार 820 नावांची दुहेरी नोंद

पैठण तालुक्यात 3 लाख 2 हजार 231 मतदारांपैकी 23 हजार 122 मतदारांची 2 ठिकाणी नोंद

पैठण नगरपरिषद हद्दीतील 35 हजार 722 पैकी 2 हजार 698 मतदारांची नावं 2 याद्यांमध्ये

Maharashtra Voter Scam update
Shocking : कोचिंग क्लासमधील मुलीवर नराधमाची वाईट नजर; शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ

तर मतदार यादीतील हा घोळ समोर आल्यानंतर आम्ही थेट दुहेरी नोंद असलेल्या मतदाराला गाठलं आणि यामागचं सत्य जाणून घेतलंय. या प्रकरणी साम टीव्हीने तहसिलदारांचीही भेट घेतली. त्यावेळी तहसिलदारांनी जनसुनावणी घेऊन मार्ग काढण्याचं जाहीर केलंय.

Maharashtra Voter Scam update
Meat Ban Row : १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी; विरोधकांकडून चिकन बिर्याणी आणि मटण कुर्मा पार्टी, कधी अन् कुठे?

छत्रपती संभाजीनगरच्या फक्त पैठण या एकाच तालुक्यात तब्बल 23 हजार बोगस मतदार आढळून आल्याने आयोगाची इभ्रत वेशीला टांगली गेलीय.. त्यामुळे आता आयोग ही दुहेरी नावं कधी वगळणार? आणि बोगस नावं न वगळणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com