अरे बापरे! पुराचं आक्राळविक्राळ रूप, कचाट्यात सापडली थार | VIDEO

Thar Jeep stranded in flooded underpass Himayatnagar Nanded : मुसळधार पावसानं राज्याच्या काही भागात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळलाय. नांदेडमध्येही काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. याच पुराच्या पाण्यात काही जण अतिधाडस करतात. तोच एका थारचालकाच्या अंगाशी आला. पॉवरफुल्ल थार पुराच्या पाण्यात अडकली.

संजय सूर्यवंशी, नांदेड

नांदेड जिल्ह्यात सकाळपासून पाऊस सूरू आहे. हिमायतनगर तालुक्यातील हदगाव-हिमायतनगर रस्त्यातील रेल्वेच्या भूयारीमार्गात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी साचलं. या पाण्यातून एकाने थार नेण्याचा प्रयत्न केला. पण पाणी वाढल्यानं थार बंद पडली आणि अडकली. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव जवळची ही घटना आहे. सुदैवाने चालक सुखरूप बाहेर निघाला.

किनवट तालुक्यातील गाव पाण्यात

नांदेड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका किनवट तालुक्याला बसला. किनवट तालुक्यातील गणेशपुर हे गाव पाण्याखाली गेलं. लोणी तलावाच्या कालव्याचे पाणी गावात शिरल्याने गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली. गावातील अनेक घरे पाण्याखाली गेल्याने घरातील संसारपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालं. या गावापर्यंत प्रशासन पोहोचलं नसल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com