Horoscope  Saam tv
राशिभविष्य

Saturday Horoscope : आजचा दिवस भाग्याचा ठरणार; ५ राशींच्या लोकांना आयुष्यातील शुभ क्षणाचे संकेत मिळणार

Saturday Horoscope in Marathi : काही राशींच्या लोकांसाठी भाग्यकारक दिवस ठरेल. तर काहींना शुभ संकेत मिळतील.

Anjali Potdar

पंचांग

शनिवार,२९ नोव्हेंबर २०२५, मार्गशीर्ष शुक्लपक्ष.

तिथी-नवमी २३|१६

रास-कुंभ २०|३४ नं. मीन

नक्षत्र-पूर्वभाद्रपदा

योग-हर्षण

करण-बालव

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - जीवनामध्ये अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यापैकी एक म्हणजे आपले महत्त्वाचे पत्र व्यवहार ते आज योग्य व्यक्तीने पार पडतील. आवडत्या जवळच्या व्यक्तींचा जसे की मित्र-मैत्रिणी यांचा सहवासाने मन आनंदाने फुलून जाईल.

वृषभ - सामाजिक क्षेत्रात चांगले घोडदौड होईल. तुम्ही केलेल्या कामाची योग्य पावती तुम्हाला मिळणार आहे. इतरांवर प्रभाव राहील. कर्माची साथ उत्तम मिळेल. त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीचा दिवस आहे.

मिथुन - अनेक दिवस वाट पाहत असणारे एखादी भाग्य कार्यक्रम घटना आज तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. कृतकृत्य झाल्यासारखे भावना येईल. गुरुकृपा विशेष लाभेल. दिवस चांगला आहे.

कर्क - आपले महत्त्वाचे कामे आज रखडण्याची शक्यता आहे. मनोबल सुद्धा कमी राहील. आज काही गोष्टी प्रॅक्टिकली विचार करून करावे लागतील. सगळीकडे भावनिकतेचा उपयोग होत नसतो. हे लक्षात घ्या.

सिंह - दिवस बरा आहे. दिनचर्या ठरल्याप्रमाणे होईल. रखडलेले कामे मार्गी लागतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आज जोडीदाराचा सल्ला तुम्हाला लाभदायक ठरेल.

कन्या - कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने आज पुढे जाणार आहात. मात्र एकाच वेळी सगळ्या चांगल्या गोष्टी होतील असा दिवस तो कसा. आज वेळ आणि पैसा मात्र वाया जाण्याची दाट शक्यता आहे.

तुळ - संतती सौख्याला दिवस चांगला आहे. एखाद्या आर्थिक क्षेत्रांमध्ये धाडस धडाडी करायला हरकत नाही. लक्ष्मीची विशेष वरदहस्त आणि कृपा आपल्यावर राहणार आहे. त्यामुळे गुंतवणुकीला दिवस चांगला आहे.

वृश्चिक - आयुष्यामध्ये सर्वच गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या बॅलन्स करणेही गरजेचे आहे. आज जमिनीचे व्यवहार काही असतील तर त्यातून पैसा मिळेल. इतर पैशाची निगडित असणारी कामे जसे शेतीवाडी, क्रयविक्रिया म्हणून विशेष लाभ संभवत आहे.

धनु - आत्मविश्वास हा तुमच्या राशीला आहेच. आज त्याच्यामध्ये वाढ होईल. मनोबल वाढणार आहे. ठरवून केलेल्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे महत्त्वाची एखादी जबाबदारी खांद्यावर येऊन पडेल.

मकर - पैसा कोणाला नको असतो. काही नवे बदल होतील. जुनी आणि सुद्धा वसूल होणार आहेत. मग आपली व्यवहाराला चौख असणारी रास या दृष्टीने पैशाचे योग्य नियोजन होईल.

कुंभ - उत्साह, उमेद वाढवणाऱ्या घटना आज घडणार आहेत. कधी कधी काहीही कारण लागत नाही, पण मन आनंदी आणि आशावादी राहते. आज तुम्हाला ग्रहांची उत्तम साथ मिळणार आहे.

मीन - साधेपणाने सगळीकडे वागून चालत नाही. आपल्याच व्यक्तीवर अधिक विश्वास ठेवू नका. वस्तू गहाळ होणार नाहीत ना याची विशेष दक्षता घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

SCROLL FOR NEXT