श्री वासुदेव सत्रे
ज्योतिष व वास्तुशास्त्र मार्गदर्शक, मोबाईल नंबर - 9860187085
आजचे राशीभविष्य, १० जानेवारी २०२६
मेष - "जगी सर्व सुखी असा कोण आहे" प्रत्येक सुखाची आशा ठेऊ नका. अल्प नाही पण आहे त्यात समाधान ठेवा. जास्त धडपड यश देणार नाही, बौद्धिक कामात यश भेटेल.
वृषभ - फार त्रास नाही तर फार सुख पण नाही असा एकंदरीत आजचा दिवस राहील. दैनंदिनी आहे तशीच राहिल, फक्त थोड्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या जाणवतील. काळजी घ्यावी.
मिथुन - व्यावसायिकांसाठी उत्तम दिवस आहे. येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करा. अगाऊ पैसे देणं टाळा. प्रदेशाशी संबंधित एखादी डील आली तर सोडु नका.
कर्क - कुणालाही न सांगता आपला उद्योग सुरू ठेवा. पण उद्योगाबाबत बोलताना नतद्रष्टता नसावी. नाविन्यपूर्ण काही कल्पना उद्योगात आचरणावी.
सिंह - समाज कार्यात वेळ जाईल. कोणत्याही कामाला सहज लोकमान्यता मिळेल. स्वभावात तारतम्य बाळगावे. दत्तोपासना करावी.
कन्या - पती / पत्नी वाद टाळावेत. उभयतांनी कुलदेवतेची उपासना करावी. घराबाहेर जास्त वेळ (पुरुषाने) घालवल्यास उत्तम. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
तूला - नवीन कपडे किंवा गरजेच्या वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक आनंद गगनात मावेनासा होईल. विवाहाच्या अनेक वर्षांनंतर, नवविवाहीत असल्या सारखे वाटेल.
वृश्चिक - प्रेमात यश मिळेल आणि मिळालेलं यश टिकून राहील. श्री कृष्णाची उपासना करावी. घरातील वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद मिळतील.
धनू - बांधकाम व्यावसायिकांना अतिशय उत्तम दिवस आहे. अनेक दिवसांच्या व्यवसायिक अडचणी दूर होतील. नवग्रह मंदिरात जाऊन पिवळे अन्नपदार्थ दान करावेत. शुभवार्ता भेटेल.
मकर - नौकरीत बढोतरी मिळण्याचे योग आहेत. घरातुन बाहेर पडताना दह्याचे गोड पदार्थ खाऊन निघा. मितभाषी असल्याने व्यावहारिक अडचणी येणार नाहीत.
कुंभ - पैसे जपून खर्च करा. दृष्ट लागली असल्यास आईच्या पदराने काढायला सांगा. खूप आकर्षक वस्त्र परिधान करणं टाळावं.
मीन - साडेसाती चालू आहे तरीही तुमची चैन आहे. कारण ज्या राशीचा स्वामी स्वयं गुरू आहे त्याचं कुणी काय करेल. पण साडेसातीत आपल्या ज्ञाताज्ञात केलेल्या पापांचा हिशोब होतो. निश्चिंत राहा छान दिवस आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.