horoscope  Saam tv
राशिभविष्य

Raksha bhandhan 2025 : सुख समृद्धी प्राप्त होणार; या रक्षाबंधनाला ५ राशींच्या लोकांचं आयुष्य चमकणार

saturday Horoscope : आज काही राशींच्या लोकांना सुख समृद्धी प्राप्त होईल. तर काहींचं आयुष्य चमकणार आहे. वाचा शनिवारचं राशीभविष्य

Anjali Potdar

आजचे पंचांग

शनिवार,९ ऑगस्ट २०२५,श्रावण शुक्लपक्ष,रक्षाबंधन.

तिथी-पौर्णिमा १३|२५

रास-मकर २६ नं.कुंभ

नक्षत्र-श्रवण

योग-सौभाग्य

करण-बवकरण

दिनविशेष-चांगला दिवस

मेष - तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही आघाडीवर असाल. नवीन संकल्पनांनी घेतलेले श्रम तुमच्या कामात यश खेचून आणणार आहात. कामाच्या ठिकाणी आपला विशेष आदर होईल.

वृषभ - एखादी महत्त्वाचे वार्ता कानावर येईल. धार्मिक कार्यामध्ये आपला सहभाग असेल. भाग्यकारक घटना घडत असताना अचंबित व्हाल अशा काही गोष्टी आज होणार आहेत. विष्णू उपासना करावी.

मिथुन - कोणाचेही सहकार्याची अपेक्षा न करता कामे करावी लागतील. आपल्या राशीतला असणारा गोडवा जपा.शक्यतो कोणाशी वाद विवाद आज टाळणे गरजेचे आहे.

कर्क - वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. समोरचा काय म्हणतो हे आज समजून घेणे आवश्यक आहे. मगच पुढे पाऊले टाका. व्यवसायात आणि जीवनातील जोडीदाराबद्दल सामोपचाराने घ्यावे लागेल.

सिंह - काही ना आरोग्याच्या तक्रारी आज जाणवतील. दैनंदिन कामे विनाकारण रखडण्याची दाट शक्यता आहे. मनस्थिती सांभाळून पाऊले पुढे टाकावे लागतील.

कन्या - मुला-मुलींचे प्रश्न अनेक दिवस रेंगाळत पडले असतील तर आज ते मार्गी लागतील.कलाक्षेत्रामध्ये विशेष संधी मिळण्याचा आजचा दिवस आहे. भगवंताची उपासना करावी.

तूळ - प्रॉपर्टीचे सौख्य चांगले. रक्षाबंधन असल्यामुळे घरी कुटुंबीयांबरोबर आनंदाने वेळ व्यतीत कराल. कामानिमित्त काही प्रवासही होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे.

वृश्चिक - जिद्दीने कामे कराल. धाडसाने ती पारही पा. जवळचे प्रवास होतील. भावंड सौख्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. बहिणीला विशेष माया प्रेम द्यालच याबरोबर काही विशेष पराक्रमही आज घडतील.

धनु - व्यवसायामध्ये नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक निर्णय काही असतील तर आज ते मार्गी लागतील. धाडसाने पुढे जावे लागेल. धनाची आवक चांगली आहे.

मकर - आज रक्षाबंधनाचा दिवस आहे. कुटुंबीयांबरोबर आनंद वाटेल.नवीन दिशा नवीन मार्ग सापडतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दिवस चांगला आहे.

कुंभ - महत्त्वाची कामे रखडण्याची आज दाट शक्यता आहे. वाहने सुद्धा जपून चालवावीत असा सल्ला आहे. आपले जिन्नस आणि ऐवज यांची विशेष काळजी घ्या.

मीन - सणासुदीच्या दिवसांमध्ये एक वेगळी धामधूम असते. आज प्रियाजनांचा सहवास लाभेल. मित्र-मैत्रिणींच्या मुळे दिवस सुखद घटनांचा जाईल. काळजी नसावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दोन व्यक्तींनी दिली १६० जागांची गॅरंटी, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा, मुख्यमंत्र्यांचा उलट सवाल

Home Vastu Tips: आर्थिक समृद्धीसाठी घरात कोणते वास्तु बदल करावेत?

Maharashtra Vande Bharat Express : महाराष्ट्रातून धावणार देशातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत, १० ठिकाणी थांबे अन् ११ तासांचा प्रवास, वाचा सविस्तर

वेब सिरिज पाहिली अन् सातवीच्या पोराने टोकाचे पाऊल उचलले, घरातच आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत - फडणवीस

SCROLL FOR NEXT