ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वयंपाकघर हे अन्न आणि समृद्धीची देवी असलेल्या अन्नपूर्णा देवीचे स्थान मानले जाते.
असे म्हटले जाते की, स्वयंपाकघरासारख्या ठिकाणी स्वच्छता आणि तिथे ठेवलेल्या वस्तूंचा थेट परिणाम घराच्या आरोग्यावर, आनंदावर आणि आर्थिक स्थितीव
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील कोणत्या गोष्टींमुळे घरात दरिद्रता येते, जाणून घ्या.
जर ग्लास, प्लेट्स, कप किंवा वाट्या यांसारखी भांडी तुटलेली असतील तर ती स्वयंपाकघरात ठेवू नयेत.
तुटलेली भांडी घरात नकारात्मक ऊर्जा आणतात आणि नशिबावर परिणाम करतात. फक्त स्वच्छ आणि चांगली भांडी वापरा.
स्वयंपाकघर हे मंदिरा इतकेच पवित्र मानले जाते. तिथे बूट किंवा चप्पल घालून जाऊ नये आणि तिथे घाणेरडे कपडेही ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मीला राग येऊ शकतो.
स्वयंपाकघरात कधीही कुजलेले, शिळे अन्न किंवा खराब धान्य ठेवू नका. यामुळे आरोग्य बिघडू शकते आणि घरात गरिबी देखील येऊ शकते.