Horoscope Today in Marathi  Saam tv
राशिभविष्य

Horoscope Today : प्रेमामध्ये यशस्वी व्हाल, तर काहींना करावा लागेल खर्चाचा ताळमेळ; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today in Marathi : काही राशीचे लोक प्रेमामध्ये यशस्वी होतील. तर काहींना खर्चाचा ताळमेळ करावा लागेल. वाचा तुमचे आजचे राशीभविष्य, वाचा एका क्लिकवर

Anjali Potdar

आजचे पंचांग

मंगळवार,१७ डिसेंबर २०२४,मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

तिथी- द्वितीया १०|५७

रास- मिथुन १८|४८ नं. कर्क

नक्षत्र- पुनर्वसु

योग- ब्रह्मा

करण- गरज

दिनविशेष-उत्तम दिव

मेष - मार्गशीर्ष महिन्यासारखा उत्तम मास आपल्याला अनेक लाभ पदरात घालणारा ठरेल. आज याची विशेष प्रचिती आपल्याला येईल. मित्रमंडळींकडून फायदा आणि आनंद दोन्ही गोष्टी दिसून येत आहेत.

वृषभ- मोठ्या प्रवासाचे बेत आखले जातील. कदाचित ते पर्यटनासाठी सुद्धा असतील. खर्चाचा ताळमेळ बसला तर हे नियोजन यशस्वी ठरेल. नको असलेल्या गोष्टींचा उगाच त्रागा आणि चिंता आज नकोत.

मिथुन -आपल्या गोड बोलण्यामुळे समोरच्याचे मनामध्ये घर कराल. व्यवसायामध्ये वृद्धीसाठी तुमची ही साखरपेरणी आज महत्त्वाची ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्वामुळे समोरच्यावर उत्तम प्रभाव आज पडेल.

कर्क - सुखाची बैठक आज दारी आहे. जुन्या आठवणींच्या उजळ्या मध्ये मन राहून जाईल. कुटुंबीयांची साथ चांगली मिळाल्यामुळे सुखाचा स्तर वाढेल. दिवस चांगला आहे.

सिंह - काहीतरी वेगळं साहस करावे असं आज आपल्याला वाटेल. त्यासाठी छोटे प्रवास घडतील. पण जबाबदाऱ्या मोठ्या पार पाडाव्या लागतील. यातूनच तुम्हाला आज स्वतःसाठी प्रेरणा मिळेल.

कन्या - काहीतरी नवीन गोष्टीची खरेदी आज घरासाठी होईल. पण अनेक दिवस रेंगाळत असलेल्या विचाराबाबत आज द्विधा मनस्थिती टाळा. घरच्यांचा कौल माना आणि पुढे चला.

तूळ- प्रेमामध्ये यश प्राप्ती आहे. समोरची व्यक्ती तुम्हाला आज समजून घेईल. स्वप्नांना नव्याने पंख फुटतील. संतती पासून सुखाच्या वार्ता येतील. लक्ष्मी उपासना आज फलदायी ठरेल.

वृश्चिक -मामाकडे, आजोळी आज काही व्यवहारिक गोष्टी होतील. कदाचित तुमच्या गोष्टी इतरांना रुचतील असे नाही तरीसुद्धा तुम्ही मान्य करण्यासाठी प्रयत्नवादी रहा. मनाचे विशेष कांगोरे आज उलगडतील.

धनु - नको असलेल्या गोष्टींचा ससेमीरा बरेच दिवस मागे लागलेला आहे. पण आज कोर्टकचेरीच्या कामांमध्ये तुमच्या बाजूने यशप्राप्ती होणार आहे. दिवस चांगला जाईल.

मकर - कामाच्या ठिकाणी आपला थोडा वट राहील.जसे दिसते तसे नसते हे आज जाणवेल. उगाच कोणी आपल्याला फसवत नाही ना याचा चार वेळा विचार करून त्या दृष्टीने पावले उचला. दिवस संमिश्र राहील.

कुंभ -आयुष्यात प्राधान्य कशाला द्यायचं हे उमगले तर पुढचे मार्ग सुकर होतात. आज भाग्याने अनेक गोष्टी आपल्या पदरामध्ये दिलेल्या आहेत. यशाची कमान चढती राहील. पण ज्याने हे दिले आहे त्याला विसरू नका.

मीन - साधेपणामध्ये तुमचे अस्तित्व दडलेले असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये असणारी उर्मी ही कामाच्या स्वरूपात बाहेर पडते. आज आपले कर्म बहरणार आहे. त्याचे सात्विक समाधान आपल्याला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT