Shani-Rahu Yuti saam tv
राशिभविष्य

Shani-Rahu Yuti: 30 वर्षानंतर मीन राशीत राहू-शनीची युती; 'या' ३ राशी जगणार ऐशो-आरामाचं आयुष्य

Shani And Rahu Yuti 2025: सध्या मायावी ग्रह राहू मीन राशीत भ्रमण करतोय. तर न्यायाधीश शनिदेव २९ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती मीन राशीत होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक अंतरानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या राशी बदलामुळे एका राशीत दोन ग्रहांचा संयोग म्हणजेच युती होते. याचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर पडताना दिसतो. पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात दोन महत्त्वाच्या ग्रहांची युती होणार आहे.

सध्या मायावी ग्रह राहू मीन राशीत भ्रमण करतोय. तर न्यायाधीश शनिदेव २९ मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे या दोन्ही ग्रहांची युती मीन राशीत होणार आहे. अशा परिस्थितीत, या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यावेळी काही राशींना चांगले दिवस येणार आहे. यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे ते पाहूयात.

कुंभ रास

शनि आणि राहूची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी असणार आहे. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. विवाहितांना वैवाहिक आनंद मिळेल. कोर्टाच्या केसेसमध्ये तुमचा फायदा होणार आहे.

धनु रास

शनिदेव आणि राहू ग्रहाचं संयोजन धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतं. यावेळी सर्व भौतिक सुख प्राप्त करू शकता. वाहन किंवा घऱ खरेदी करू शकता. एका मोठ्या प्रकल्पाचा भाग बनू शकता. जर तुमचं काम किंवा व्यवसाय रिअल इस्टेट, मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित असेल तर तुम्हाला लाभ मिळू शकतात.

मिथुन रास

राहू आणि शनिदेवाची युती तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरणार शकते. या वेळी, तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळू शकणार आहे. नोकरीत पदोन्नती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही अनुकूल बदल होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याची शक्यता आहे. चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT