Weekly Horoscope Saam Tv
राशिभविष्य

Weekly Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

या आठवड्यात ग्रहांची स्थिती काही विशिष्ट राशींसाठी अत्यंत शुभ योग निर्माण करत आहे. हा आठवडा खासकरून व्यवसाय (Business) आणि आर्थिक प्रगतीसाठी नवीन संधी घेऊन येत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

मेष

सप्ताहाच्या सुरुवातीला तृतीयेतील चंद्र-शुक्राचा शुभयोग छोटे प्रवास, सहली घडविणारा राहील. उत्तरार्धातील चंद्र-गुरू युती घर, जागेच्या कामासाठी अनुकूल राहील. घरात धार्मिक मंगल कार्य घडेल.

वृषभ

कुटुंबात आनंदादायक घटना घडेल. नोकरीमध्ये वेतनवाढ मिळेल. उत्तरार्धातील चंद्र-शुक्र युती प्रसिद्धी-पुरस्कार देणारी राहील. चंद्र-केतू युती घरापासून दूर जाण्यासाठी पोषक असून, बदली/पदोन्नती होईल.

मिथुन

धनस्थानातील चंद्र-गुरू युती उत्पन्नात वाढ करणारी राहील. मोठी गुंतवणूक कराल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. उत्तरार्धात महत्त्वाच्या कामात खंड पडेल. नियोजित प्रवास रद्द होतील.

कर्क

दूरचे प्रवास, परदेश गमनाचे बेत आखाल. भावंडांसाठी मोठे खर्च होतील. राशीतील चंद्र-गुरू युती नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रवृत्त करणारी राहील. आरोग्यात चांगली सुधारणा होईल.

सिंह

नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. तरुणांचे विवाह जमतील. व्ययातील चंद्र-गुरू योग घरी वाहन खरेदीसाठी अनुकूल राहील. मोठे कर्ज मिळेल. परदेशगमनासाठी प्रयत्न होतील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या

व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीत वरिष्ठांशी सुसंवाद वाढेल. नोकरीत पगारवाढ मिळेल. लाभातील चंद्र-गुरू जुनी मोठे लाभ मिळवून देणारी राहील. उत्तरार्धात मोठे प्रवास रद्द होतील.

तूळ

प्रवास, तीर्थयात्रा कराल. कलाकारांना संधी मिळेल. गुरुजनांचा सहवास लाभेल. दशमातील चंद्र-गुरू युती व्यवसायात वाढ करणारी राहील. नोकरीत पदोन्नती मिळेल. सामाजिक, राजकीय क्षेत्रात पद-प्रतिष्ठा लाभेल.

वृश्चिक

सप्ताहात होणारा चंद्र-शुक्र शुभयोग अचानक धनप्राप्ती करणारा राहील. पेन्शन, वारसा हक्काची कामे होतील. उत्तरार्धात नोकरीमध्ये बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न होतील. सरकारी कामात अडथळे संभवतात.

धनू

भागीदारीच्या व्यवसायात लाभ होतील. कोर्टकचेरीमध्ये अनुकूल निर्णय होतील. अष्टमातील चंद्र-गुरू युती अनपेक्षित लाभदेणारी राहील. वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे व्यवहार होतील. पेन्शन/वारसाहक्काची कामे होतील.

मकर

हाताखालच्या लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. हितशत्रूचा उपद्रव कमी होईल. आरोग्याची तक्रार राहील. तरुणांचे विवाह जमविण्यासाठी अनुकूल काळ राहील. कोर्टकचेरी/वादविवाद सामंजस्याने सुटतील.

कुंभ

तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जमतील. मुलांकडून आनंद मिळेल. षष्ठातील चंद्र-गुरू युतीमुळे नवीन नोकरीची संधी मिळेल. पदोन्नती होईल. हाताखालच्या लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल.

मीन

घरात पाहुण्यांची वर्दळ वाढेल. घरात उंची वस्तूंची खरेदी होईल. पंचमातील चंद्र-गुरू युती मुलांच्या समस्या सोडविणारी राहील. विद्यार्थी वर्गाला मोठे यश मिळेल. शेअर्ससारख्या व्यवसायात मोठा लाभ होईल

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhau Kadam: 'वडील फक्त रडत होते…', भाऊ कदम यांनी सांगितला ‘तो’ खास भावनिक प्रसंग, म्हणाले- 'आज इतकं नाव कमावलं पण...'

पिंपळे परिवारावर दुखा:चा डोंगर; भाजप आमदाराच्या वडिलांचं निधन; मंत्र्यांकडून शोक व्यक्त

देशात मोठ्या घातपाताचा कट उधळला, डॉक्टराच्या घरातून 300 किलो RDX, एके ४७ अन्...

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र गारठला, मुंबई, पुण्यासह राज्याचा पारा घसरला

Kanya Sumangala Yojana: सरकारी योजनेत मुलींना मिळतात ७५,००० रुपये; कन्या सुमंगला योजना आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT