Shukra Gochar 2023
Shukra Gochar 2023 Saam tv

Guru Gochar: दिवाळीपूर्वी गुरु करणार कर्क राशीत गोचर; 18 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींना मिळणार पैसाच पैसा

Guru Gochar October 2025: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह (Jupiter) हा धन, सौभाग्य, ज्ञान आणि विस्ताराचा कारक मानला जातो. यंदा दिवाळीच्या अगदी तोंडावर, १८ ऑक्टोबरपासून गुरु ग्रह अत्यंत महत्त्वाचे गोचर (Transit) करत आहे.
Published on

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह सध्या मिथुन राशीत अतिचारी अवस्थेत भ्रमण करत आहेत. ‘अतिचारी अवस्था’ म्हणजे एखादा ग्रह आपल्या नेहमीच्या गतीपेक्षा अधिक वेगाने चालत असलेली स्थिती. ज्योतिष्य गणनेनुसार गुरु म्हणजेच बृहस्पति ग्रह १८ ऑक्टोबर रोजी मिथुन राशीतून बाहेर पडून कर्क राशीत प्रवेश करणार आहेत आणि ४ डिसेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे.

यंदा दिवाळीचा सण २० ऑक्टोबरला साजरा होणार आहे. दिवाळीपूर्वीच होणारा हा गुरुचा कर्क राशीतला गोचर मेष ते मीन या सर्व राशींवर परिणाम करणार आहे. यापैकी काही राशींवर हा गोचर विशेषतः शुभफलदायी ठरणार आहे. या काळात तीन राशींना भाग्याची साथ लाभणार आहे. यावेळी करिअर, अर्थव्यवस्था आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक घडामोडी होणार आहे. यावेळी कोणत्या राशींना याचा लाभ होणार आहे ते पाहूयात.

Shukra Gochar 2023
Shani Gochar 2025: ३० वर्षांनी शनी करणार गुरुच्या राशीत प्रवेश; शनी देवाच्या कृपेने 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

मिथुन रास

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचं हा गोचर लाभदायक ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची नवी दालनं उघडू शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होणार आहे. खर्चात काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आर्थिक स्थिती अधिक स्थिर होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असणार आहे. अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.

Shukra Gochar 2023
Budh-Guru Yuti: 12 वर्षांनी बनणार बुध-गुरुची महायुती; 3 राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

कन्या रास

कन्या राशीच्या जातकांसाठीही गुरुचं गोचर शुभ मानला जातो. नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नात वाढ तसेच पदोन्नतीची संधी मिळू शकते. व्यवसायात आधीपेक्षा चांगली परिस्थिती निर्माण होईल. कौटुंबिक अडचणी कमी होणार आहे आणि घरात समाधानाचे वातावरण राहणार आहे. सामाजिक स्तरावर मान-सन्मानात वाढ होणार आहे.

Shukra Gochar 2023
Shani Gochar 2025: 3 ऑक्टोबरपासून 'या' राशींच्या घरात येणार पैसा; 27 वर्षांनंतर शनी करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

मीन रास

मीन राशीच्या जातकांचा आत्मविश्वास या काळात वाढणार आहे. प्रेम, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित बाबींमध्ये चांगले परिणाम दिसणार आहेत. केलेल्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल आणि अडकलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहेत. प्रेमजीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या स्थिरता येणार आहे.

Shukra Gochar 2023
Shani Gochar: 27 वर्षांनी शनी करणार गुरुच्या घरात प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com