Horoscope In Marathi Saam tv
राशिभविष्य

Monday Horoscope : मानसिक ताण अन् विनाकारण खर्च होणार; ५ राशींच्या लोकांवर नवं संकट

Monday Horoscope in Marathi : आज काही राशींच्या लोकांना मानसिक ताण होईल. तर काहींचा विनाकारण खर्च होईल.

Anjali Potdar

पंचांग

सोमवार,१० नोव्हेंबर २०२५,कार्तिक कृष्णपक्ष.

तिथी-षष्ठी २४|०९

रास- मिथुन १३|०३ नं. कर्क

नक्षत्र-पुनर्वसु

योग-साध्य

करण-गरज

दिनविशेष-उत्तम दिवस

मेष- वेगळे साहस आणि धाडस करायला आपल्या राशीला कायमच आवडते. आज विविध प्रकारची वाहने हाताळायला आवडतील. जवळच्या प्रवासातून वेगळे सुख शोधाल. भावंड सौख्य उत्तम आहे.

वृषभ - खाण्यापिण्यावर आपल्या राशीला विशेष प्रेम आहे. आज कुटुंबीयांच्या बरोबर बाहेर जेवायला जायचा बेत आखाल. सुंदरशी मेजवानी आज तुमच्या नशीबात आहे. धनाशी निगडित उलाढाली सुद्धा होतील. एकूणच दिवस सार्थकी लागेल.

मिथुन - एखाद्या गोष्टीचा ध्यास आणि ध्येय घेऊन आज पेटून उठाल. आपल्यात उपजत असणारी बोलण्याची कला याला वक्तृत्वाचे एक सुंदरसे वलय प्राप्त होईल. सकारात्मक गोष्टींनी भारावलेला दिवस असेल.

कर्क - मनातील गोष्टी कुणाशी तरी बोलाव्यात. आपली भावना कुठेतरी व्यक्त करावी असे आज वाटेल. पण योग्य त्या व्यक्तीची निवड करणे आज गरजेचे आहे. अन्यथा आपल्या बोलण्याचा विपर्यास होऊन मानसिक ताण वाढतील .विनाकारण खर्चही होतील.

सिंह - मित्र-मैत्रिणींशी वागताना आज विशेष काळजी घ्या. आपल्या राशीला इगो जरा जास्तच आहे.आपल्यामुळे आज कोणी दुखावले जाणार नाही ना यावर लक्ष द्या. गुंतवणुकीला मात्र दिवस चांगला आहे. विविध लाभ होतील.

कन्या - बुधाची जरी रास असली आपली तरीसुद्धा कष्ट आणि मेहनतीला आपण मागे हटत नाही. आज काम करणे हेच खऱ्या अर्थाने कर्म आहे आणि त्यातून तुमच्या आयुष्याची वेगळी जडणघडण होईल. समाजात मान मिळेल.

तूळ - आयुष्यामध्ये ध्येयाने पेटून उठणारी आपली रास आहे. वैश्य प्रवृत्तीचा धडा इतरांना देणारी आपली रास आहे. कामाच्या बाबतीत आज सचोटीने व्यवहार होतील आणि व्यवसायात एक वेगळा पराक्रम आज तुमच्याकडून घडेल.

वृश्चिक - खरे तर मंगळाची जरी रास असली तरी भावनिकता आपल्या राशीमध्ये आहेच. इतरांना समजून घेण्याचा पण आटोकाट प्रयत्न करता त्यामुळे काही वेळेला सहकार्याच्या नादात एका एकट्यानेच अनेक कामे करावी लागतात. आजच्या दिवशी कोणाविषयी तक्रार करावीशी वाटणारच नाही इतका एकटेपणा असेल.

धनु - अग्नी तत्वाची आपली असणारी रास कायमच कामे घेण्यासाठी पुढाकार घेणारी आहे. कामाला न थकता घोडदौड चालूच असते. आज व्यवसायात हुरूप आणणाऱ्या गोष्टी असतील.

मकर - शनि प्रधान असणारी आपली रास चिकट आणि चिवट आहे. त्यामुळे हाती घेतलेले काम पूर्ण झाल्याशिवाय आपण थांबत नाही. नोकरीच्या ठिकाणी हिच आज तुमची उजवी बाजू ठरेल. तब्येत मात्र जपा.

कुंभ - संशोधनात्मक गोष्टी करण्यासाठी आपली रास कायमच आघाडीवर असते. उत्तम अशी बौद्धिक रास आहे नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कला क्रीडा क्षेत्रातही बाजी माराल असे दिसते आहे. शिव उपासना करावी.

मीन - आपल्या राशीला देव भोळी रास असे म्हटलं आहे. घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यामध्ये आज सहभागी व्हायला तुम्हाला आवडेल. शेतीवाडीच्या व्यवहारातून योग्य तो नफा मिळेल. दिवस चांगला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हेलिकॉप्टर बैज्या आणि ब्रेकफेल बैलजोडी ठरली फार्च्युनरची मानकरी; पुढच्या शर्यतीसाठी महागड्या कारची घोषणा

Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला होम ग्राऊंडवर मोठा धक्का; कट्टर तटकरे समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महायुतीत मिठाचा खडा? तानाजी सावंतांची राष्ट्रवादीवर जहरी टीका, अजित पवारांच्या नेत्याकडूनही जोरदार पलटवार

Maharashtra Live News Update : अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची विचारपूस करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी जिल्हा रुग्णालयात

राधाकृष्ण विखेंची गाडी फोडल्यास १ लाखाचं बक्षीस! बच्चू कडूंचा संतापजनक इशारा

SCROLL FOR NEXT